पाठीवर टॅटू, विषारी मशरुमचा प्लॅन... एक नाही अनेक भयंकर गोष्टींचं प्लॅनिंग, केतनला संपवण्यासाठी सियाच्या डोक्यात होत्या भलत्याच गोष्टी
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडात दाखल झालेल्या 5,053 पानी चार्जशीटमधून Google Search, मशरूमद्वारे हत्या करण्याची कथित योजना, लोहगडची रेकी आणि डिजिटल पुराव्यांसह अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.
ADVERTISEMENT

श्रीकृष्ण पांचाल, पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास पूर्ण करत पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात तब्बल 5,053 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात WhatsApp चॅट, मोबाइल डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, फोटो, CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांचे जबाब अशा विविध पुराव्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, केतन अग्रवालच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा कथित प्रयत्न करण्यात आला होता.
या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांची आरोपी म्हणून नावे आरोपपत्रात आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, या प्रकरणात डिजिटल माध्यमांचा वापर करून कथित कट रचण्यात आला आणि केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट Instagram अकाउंटचाही वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
Google Search पासून गुन्ह्याच्या कथित नियोजनापर्यंत
आरोपपत्रातील माहितीनुसार, या प्रकरणात इंटरनेटवर विविध प्रकारच्या शोधांचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामध्ये पूर्वीच्या हत्याकांडांचा अभ्यास, लोहगड आणि ट्रेकिंगदरम्यान झालेल्या दुर्घटनांची माहिती तसेच विषारी पदार्थांशी संबंधित माहिती शोधल्याचा उल्लेख आहे.
हे ही वाचा>> केतनच्या हत्येपूर्वी सियाचे चेतनशी सिक्रेट लग्न, साक्षीदार म्हणून मित्रांची स्वाक्षरी
काही वृत्तांनुसार, Death Cap Mushroom, मशरूमद्वारे हत्या आणि इतर हत्यांच्या घटनांशी संबंधित शोध घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या ऑनलाइन शोधांचा कथित कटाशी संबंध असल्याचा दावा आरोपपत्राच्या आधारे करण्यात आला आहे.
