नागपूरमध्ये भयंकर पूर, विदर्भात पावसाचा धुडगूस... धडकी भरेल अशी पुराची दृश्य!

Maharashtra Monsoon Update :  मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. वर्धा, नागपूर, गोंदिया, रायगडसह कोकण किनारी पट्ट्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.

नागपूरमध्ये भयंकर पूर, विदर्भात पावसाचा धुडगूस

नागपूरमध्ये भयंकर पूर, विदर्भात पावसाचा धुडगूस

मुंबई तक

09 Jul 2025 (अपडेटेड: 09 Jul 2025, 05:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

या जिल्ह्यांत पावसाने घातलाय धुमाकूळ

point

कोणते धरण झाले ओव्हरफ्लो?

point

आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Monsoon Update :  मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. वर्धा, नागपूर, गोंदियासह विदर्भात तुफान पाऊस बरसत असून अनेक जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे.वर्ध्यात पावसाची विक्रमी नोंद झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसच धरणाचे दरवाजे उघडल्याने नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पाहा विदर्भातील पावसाचे नेमके अपडेट काय.

हे वाचलं का?

वर्धामध्ये पावसामुळे पूरस्थिती

वर्धा जिल्ह्यात सध्या मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

निम्न वेणा धरणाचा पाणीसाठा आज सकाळी 7:00 वाजेपर्यंत 42.84% झाला आहे. त्यामुळे धरणाच्या सुस्थिती आणि नियंत्रणासाठी जलाशय परिचालन आराखड्यानुसार, धरणाचे सर्व 21 गेट्स आज सकाळी 8:00 वाजता पहिल्या टप्प्यात 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून 382.43 क्युमेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

हे ही वाचा >> "आई लवकरच जेवायला येतो", शेवटचा फोन अन् J. J. हॉस्पिटलच्या डॉक्टरने अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी..

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी पातळीनुसार विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या धरणाची जलाशय पातळी 252.350 असून, उपयुक्त पाणीसाठा 57.784 दलघमी आहे. पाणीसाठा टक्केवारी 42.84% इतकी आहे. महसूल यंत्रणेसह सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी आणि इतर सर्व यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन ग्रामस्तरावर आणि सर्व संबंधितांना त्वरित सूचित करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

 भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, मागील दोन दिवसांपासूनही अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज, बुधवार, 9 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग सेंटर्सना सुट्टी जाहीर केली आहे.

यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी तुफान पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने  वर्धा नदीला पूर आला. त्यामुळे राळेगाव वरोरा चंद्रपूर मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळपासून राळेगाव तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी. नाले दुथडी भरून वाहत असून कोसारा जवळून वाहत असलेल्या वर्धा नदीला पूर आला. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने वरोरा मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर पाटनबोरी जवळून वाहणाऱ्या खुनी नदीला पूर आल्याने मांडवा ते पाटण बोरी मार्ग बंद झाला आहे. नदी काठावरील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीने तलावाचे रूप धारण केले.

राज्यात पावसाची स्थिती काय?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी पातळीनुसार विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या धरणाची जलाशय पातळी 252.350 असून, उपयुक्त पाणीसाठा 57.784 दलघमी आहे. पाणीसाठा टक्केवारी 42.84% इतकी आहे. महसूल यंत्रणेसह सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी आणि इतर सर्व यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन ग्रामस्तरावर आणि सर्व संबंधितांना त्वरित सूचित करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
यशोदा नदीला पूर आल्याने अलमडोहला अल्लीपूर ते अलमडोह (कानगाव) मार्ग बंद झाला आहे. तसेच, नांद प्रकल्पातूनही विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मौजा शिरपूर येथील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुना बोरगाव ते नवीन बोरगाव रस्ताही बंद झाला आहे. तसच देवळी तालुक्यातील आंजी-अंदोरी रोडवरील गंगापूर नाल्याच्या पुलावरून पाणी गेलं.

हे ही वाचा >> Govt Job: ITI पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी... कसा कराल अर्ज?

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, मागील दोन दिवसांपासूनही अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आज, बुधवार, 9 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग सेंटर्सना सुट्टी जाहीर केली आहे.

    follow whatsapp