हिंगोली: अशी आई असल्यापेक्षा नसलेली बरी, प्रियकराच्या नादी लागून पोटच्या लेकराला संपवलं

मुंबई तक

11 Apr 2026 (अपडेटेड: 11 Apr 2026, 02:09 PM)

Hingoli crime : हिंगोलीच्या सोनगाव तालुक्यातील जामदया परिसरात आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. ही घटना 8 एप्रिल रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या हातावरील टॅटूच्या आधारे ओळख पटवत हिंगोली पोलिसांनी खूनाचा उलगडा केला.

Hingoli crime

Hingoli crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाचा केला खून

point

आरोपींनी सचिनला जबरदस्ती दारू पाजून दगडाचे ठेचून संपवलं

Hingoli Crime : हिंगोलीच्या सोनगाव तालुक्यातील जामदया परिसरात आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. संबंधित प्रकरणात 8 एप्रिल रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या हातावरील टॅटूच्या आधारे ओळख पटवत हिंगोली पोलिसांनी खूनाचा उलगडा केला. संबंधित प्रकरणातील मयताची ओळख सचिन राजगुरू (वय 25) रा. वढवं ता. लोणार जि. बुलढाणा अशी आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल, ज्यामुळे 'या' काही राशीतील लोकांना आर्थिक लाभ मिळणार

आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाचा काटा काढला

पोलिसांच्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी पोलिसांना सेनगाव तालुक्यातील जामदया परिसरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत बुलढाणा जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींना घडलेल्या घटनेची माहिती विचारली असता, अनैतिक संबंधात सचिन अडथळा निर्माण होत असल्याने आईनेच पोटच्या मुलाची सुपारी देत प्रियकराच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या केली, या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. 

आरोपींनी सचिनला जबरदस्ती दारू पाजून दगडाचे ठेचून संपवलं

हत्या करण्यापूर्वी मयत सचिनला आरोपी नरेश पवार आणि रामदास तनपुरे यांनी बळजबरी दारू पाजली. नंतर सोनगावच्या जामदया परिसरात आणून दारूच्या नशेत असलेल्या सचिनच्या डोक्यात दगडाने हल्ला करून त्याची हत्या केली. 

हे ही वाचा : सहकारी महिलेच्या छातीकडे टक लावून पाहणे, 'चोरून पाहण्याच्या' गुन्ह्यात मोडत नाही, हायकोर्टाने ‘ती’ FIR केली रद्द

या प्रकरणात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपी आईसह अन्य दोघांना बेड्या ठोकत सोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.