CBSE Results 2025 : 'असा' चेक करा ऑनलाईन रिझल्ट! SMS आणि Digilocker मध्येही मिळेल मार्कशीट , कसं ते जाणून घ्या

CBSE Result 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात घोषित केला जाऊ शकतो. लाखो विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा क्षण असणार आहे.

CBSE Result 2025 Latest Update

CBSE Result 2025 Latest Update

मुंबई तक

• 03:06 PM • 09 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार?

point

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी काय कराल?

point

सीबीएसईच्या निकालाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

CBSE Result 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात घोषित केला जाऊ शकतो. लाखो विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा क्षण असणार आहे. कोणत्या विषयात किती गुण मिळाले आहेत, हे पाहण्याची विद्यार्थ्यांची उत्सुकताही वाढली आहे. कारण दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी करिअरच्या दृष्टीकोनातून नवा प्रवास सुरु करणार आहेत. यावेळीही विद्यार्थ्यांना रोल नंबरच्या आधारावर त्यांचा रिझल्ट पाहता येणार आहे.

हे वाचलं का?

मागील वर्षांची आकडेवारी

2024 मध्ये CBSE ने 13 मे रोजी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल घोषित केला होता. 2023 मध्ये इयत्ता दहावीत 93.12 टक्के आणि बारावीच्या परीक्षेत 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. 2022 मध्ये इयत्ता दहावीची पासिंग टक्केवारी 94.40 टक्के होती. तर बारावीची पासिंक टक्केवारी 92.71 टक्के होती. 

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 

2024 मध्ये CBSE च्या दहावीच्या परीक्षेत 24.12 लाख विद्यार्थी बसले होते. तर 17.88 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. सीबीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी 33 टक्के गुण मिळवावे लागतात. जर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी थोडे कमी गुण मिळाले, तर त्यांना ग्रेस मार्क्स दिले जातात. 

हे ही वाचा >> भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 स्थगित, पुन्हा कधी सुरू होणार?

कसा चेक कराल सीबीएसईचा रिझल्ट?

विद्यार्थी  results.cbse.gov.in, results.cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि cbseservices.digilocker.gov.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल चेक करू शकतात.

Digilocker मधून CBSE इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कसा चेक कराल?

UMANG अॅप डाऊनलोड करा
अकाऊंट बनवून लॉग इन करा
सीबीएसई इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
रोल नंबर भरून सबमिट करा.
स्क्रीनवर निकाल पाहा आणि डाऊनलोड करा.

हे ही वाचा >> जम्मू काश्मीरवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा!

SMS च्या माध्यमातून निकाल कसा चेक कराल?

SMS अॅपवर जाऊन मेसेट टाईप करा.
इयत्ता दहावीसाठी cbse 10
इयत्ता दहावीसाठी cbse 12
SMS ला 7738299899 या नंबरवर पाठवा

    follow whatsapp