Indian pilot smit machhar : दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कॅप्टनवर चाकूने हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी विमानावरील नियंत्रण सोडले नाही. विमानात 180 प्रवासी होते. कॅप्टन मच्छार यांनी प्रवाशांच्या मदतीने हल्लेखोराला नियंत्रणात आणले आणि विमानाचे सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग केले. या घटनेनंतर इस्रायलमध्ये भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या धैर्याची चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: Digital Gold मध्ये लाखो रुपये गुंतवले, पण तुमच्यानंतर हे सोने कुणाला मिळणार?
झटापटीत कॅप्टन मच्छार गंभीर जखमी, तरीही जीवाची बाजी लावली
मिळालेल्या माहितीनुसार, विमान इस्रायलच्या दिशेने जात असताना मूळचा ओमानचा असलेल्या को-पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. को-पायलटने विमानातील अनेक यंत्रणांचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे. या झटापटीत कॅप्टन मच्छार गंभीर जखमी झाले. विमानातील प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ते रक्तबंबाळ झाले होते आणि त्यांना बोलतानाही अडचण येत होती. मात्र, त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आणि 180 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग केले.
हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरला पाऊस की ‘ऑक्टोबर हिट’? IMDचा अंदाज काय?
कॅप्टन स्मित मच्छार हे भारतीय नागरिक असून, संयुक्त अरब अमिरात सरकारच्या मालकीच्या फ्लायदुबई या विमान कंपनीत गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी स्पाइसजेटमध्ये 10 वर्षे काम केले आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांना बोईंग 737 विमानांवर 13 वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी वनलाइनर ट्रेनिंग कॅप्टन म्हणूनही काम केले आहे. त्यांच्याकडे 9,750 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असल्याची माहिती आहे. कॅप्टन मच्छार 2011 मध्ये स्पाइसजेटमध्ये दाखल झाले होते.
दरम्यान, या घटनेमागे को-पायलटचा नेमका उद्देश काय होता? याचा तपास सुरू आहे. एका इस्रायली अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे अपहरण करणे, ते इस्रायलला नेऊन ताब्यात घेणे किंवा विमान जमिनीवर पाडणे यापैकी नेमका कोणता उद्देश होता का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. संशयित हा ओमानी नागरिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. फ्लायदुबईच्या इस्रायलसोबतच्या करारानुसार, इस्रायलशी सामान्य संबंध असलेल्या देशांतील पायलट विमान बेन-गुरियन विमानतळावर नेऊ शकतात. ओमानचे इस्रायलशी सामान्य संबंध नसल्याने ओमानी को-पायलटची या विमानावर नियुक्ती कशी झाली? याचाही तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT












