भारतातील एक महिला लाइन ऑफ कंट्रोल (LoC) पार करुन पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेने एका पुजाऱ्याला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचं मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. ही महिला 43 वर्षीय असून तिचं नाव सुनीता असं आहे. सुनीता ही महाराष्ट्रातील नागपूरमध्ये राहते. ऑनलाइन माध्यमातून सुनीताची ओळख एका पुजाऱ्याशी झाली होती. मात्र, भारत-पाक युद्धाच्या तणावात LoC पार करुन पाकिस्तानात पोहोचल्यामुळे सीमा सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ADVERTISEMENT
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, ही घटना लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील हुंदरमन गावात घडली. हे गाव भारत-पाकिस्तान सीमेजवळ म्हणजेच नियंत्रण रेषेजवळ आहे. बुधवारी 14 मे रोजी सुनीता तिच्या 15 वर्षांच्या मुलाला गावात सोडून गेली आणि पायी चालत नियंत्रण रेषा ओलांडली.
मुलाला सोडून पाकिस्तानात पोहोचली
त्यावेळी त्या महिलेने तिच्या मुलाला सांगितले की ती थोड्या वेळाने परत येईल. मात्र, बराच वेळ झाल्यानंतर देखील सुनीता तिच्या गावी परत गेली नाही आणि तेव्हा गावकऱ्यांनी मुलाच्या सुरक्षिततेचा विचार करुन मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. रिपोर्टनुसार, सुनीताने यापूर्वी दोनदा पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दोन्ही वेळा तिला अमृतसरच्या अटारी सीमेवर रोखण्यात आलं.
हे ही वाचा: हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान कनेक्शन, अखेर वडिलांनी सांगितली खरी कहाणी
त्यानंतर काही लोकांनी सुनीताला पाकिस्तानात पाहिले आणि तिथल्या पोलिसांना त्यांनी हे कळवल्याची बातमी समोर आली. यानंतर सुनीता पकडली गेली आणि आता ती पाकिस्तानी एजन्सींच्या ताब्यात आहे. भारतीय यंत्रणांकडे याबद्दल अचूक माहिती नाही, परंतु गुप्तचर सूत्रांनी सुनीता पाकिस्तानात असल्याचे उघड केले आहे.
हे ही वाचा: सिगारेट आणलं नाही..भर रस्त्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं! थरारक Video होतोय व्हायरल
कुटुंबियांनी काय सांगितलं?
सुनीता ही मनोरुग्ण असून नागपूरच्या प्रादेशिक मानसोपचार रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. सुनीता मनोरुग्ण असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती तिच्या भावाने दिली.
सुनीता कोणाच्या संपर्कात होती आणि ती पाकिस्तानला का गेली? हे शोधण्यासाठी पोलीस तिचे फोन कॉल्स, मेसेजेस आणि इतर माहिती तपासत आहेत. आता प्रश्न असा आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये इतका तणाव असून एक महिला सीमा सुरक्षेला आव्हान देऊन नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात का गेली?
ADVERTISEMENT
