अडीच महिन्यांनंतर 12 वर्षीय मुलाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला, मृत्यूचं खरं कारण काय?

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 07:28 PM)

Jalgaon Crime : जळगावातील धरणगावात क्रिकेट खेळताना गणेश नवल पाटील (वय 12) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मार्च महिन्यात घडली होती, मात्र वडिलांना ही हत्या असल्याचा संशय होता. अखेर दीड महिन्यानंतर गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. नंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असता, अहवालातून मृत्यूचे खरं कारण समोर आलं.

Jalgaon Crime

Jalgaon CrimeJalgaon Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

क्रिकेट खेळताना दुर्दैवी मृत्यू

point

गणेशचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला अन्... 

Jalgaon crime : मनीष जोग - जळगावातील धरणगावात क्रिकेट खेळताना गणेश नवल पाटील (वय 12) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मार्च महिन्यात घडली होती, मात्र वडिलांना ही हत्या असल्याचा संशय होता. अखेर दीड महिन्यानंतर गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. नंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असता, अहवालातून मृत्यूचे खरं कारण समोर आलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पोटच्या लेकरांसमोर नवऱ्यानं बायकोचा गळा चिरून संपवलं, पुढं भयंकर घडलं

क्रिकेट खेळताना दुर्दैवी मृत्यू

गणेशचा मृत्यू 15 मार्च रोजी झाल्याची माहिती समोर आली. सांगण्यात येतंय की, क्रिकेट खेळताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्याच्या वडिलांना याबाबत खरा विश्वासच नाही बसला. वडिलांनी संशय व्यक्त केला की, त्यांच्या मुलाची हत्या केली. दीड महिन्याहून अधिक काळ ते आपल्या मुलाला न्याय देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडे त्यांनी संपर्क साधला, मात्र न्यायावर सुनावणी सुरूच होती. 

गणेशचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला अन्... 

अखेर अडीच महिन्यानंतर जमिनीतील गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. गणेशचे वडील नवल पाटीलने आरोप केला की, जुन्या वादातून मित्राने त्याच्या मानेवर बॅटने हल्ला केला. फॉरेन्सिक पथकाने पोलीस आणि तहसीलदाराच्या उपस्थितीत बॉडी बाहेर काढली. 

हे ही वाचा : जुन्नर: पोटच्या लेकानं बापासह सख्ख्या भावाला दगडाने ठेचून संपवलं, मृतदेहाशेजारी रात्रभर...

मृतदेह पाहून वडील धायमोकलून रडू लागले होते. पंचनाम्यानंतर मृतदेह ते शवविच्छेदनासाठी धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले.