Jalna Crime News : जालन्यात धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खुनाच्या घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हादरले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील मंगळ बाजार चौकासमोर ही थरारक घटना घडली. शाहेद सगीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. शाहेद शेख याचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. आपआपसातील भांडणातून एक ते दोन जणांनी शाहेद शेख याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात शाहेद शेख गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर शाहेद शेख याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. तरुणाचा अशा प्रकारे निर्घृण खून झाल्याची माहिती समजताच शहरात एकच खळबळ उडाली. मध्यवर्ती भागात, मंगळ बाजार चौकासमोर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान, पाहा कुठे कुठे पार पडतंय मतदान?
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करत घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आपसातील भांडणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती असून, त्याची चौकशी सुरू आहे. इतर संबंधित बाबींचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, शहरात मध्यरात्री घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हादरले आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सदर बाजार पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे. या खुनाच्या घटनेने जालना शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
परिक्षेला निघाली होती, पण शाळेत पोहोचताच आलं नाही; आठवीच्या विद्यार्थिनीसोबत घडलं भयंकर
ADVERTISEMENT











