Jalna News : गौरव साळी - जालन्याच्या पंढरपूरवाडीत खदानीत पडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत आईचे नाव कावेरी दशरथ मोहिते (वय 28) असे आहे. तर मुलीचे नाव सोनाली दशरथ मोहिते (वय 13) असे आहे. कावेरी मोहिते आणि मुलगी सोनाली या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील पंढरपूरवाडी येथील खदानीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धाराशिवमध्ये लोककलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रांवर घडला प्रकार; 'असं' बाहेर आलं प्रकरण
माय लेकीचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, कावेरी मोहिते कपडे धुताना त्यांची मुलगी सोनालीचा पाय घसरला आणि ती खदानीच्या पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी कावेरी यांनी तिला वाचण्यासाठी खदानीत उडी घेतली. पण, पाणी खोल असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्या देखील पाण्यात बुडाल्या. हे बघून दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
खदानीत दोन मृतदेह आढळले
कावेरी आणि सोनाली या बऱ्याच वेळ घरी परतल्या नाहीत, कावेरी आणि त्यांचे पती दशरथ मोहिते यांनी त्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी आणलेले कपडे आढळून आले होते. परिसरात शोधाशोध सुरु झाली असता, खदानीत दोन मृतदेह आढळून आले होते.
हे ही वाचा : तरुणीचं लग्न ठरलं होतं, तरुणाने तिला जबरदस्ती विष पाजलं अन् स्वत:च नेलं रुग्णालयात, नंतर भलतंच कांड...
दरम्यान, माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खदानीतून बाहेर काढले, नंतर उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेनं गावात शोक व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT











