तरुणाला मस्ती नडली, साप पकडताना केला दंश, नंतर तरुणाला रुग्णालयात नेलं अन् उपचारादरम्यान...

Jalna News : जालन्यातल्या निरखेडा गावात एका तरुणाला साप पकडणं जीवावर बेतलं आहे. एका तीस वर्षीय तरुण साप पकडत असताना सापानेच तरुणालाचा चावा घेतला. यातच तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला.

Jalna News

Jalna News

मुंबई तक

30 Sep 2025 (अपडेटेड: 30 Sep 2025, 03:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाला साप पकडणं जीवावर बेतलं

point

सापाने घेतला चावा

point

नेमकं काय घडलं?

Jalna News : मराठवाडा विभागातील जालन्यातल्या निरखेडा गावात एका तरुणाला साप पकडणं जीवावर बेतलं आहे. एका तीस वर्षीय तरुण साप पकडत असताना सापानेच तरुणालाचा चावा घेतला. यातच तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. साप पकडणाऱ्या मृत तरुणाचे नाव गोविंद हिवाळे असे आहे. तो गावाशेजारी असलेल्या नदीकाठी गेला असताना ही घटना घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'लांडग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ', एकाच फ्रेममध्ये बाळासाहेब ठाकरे अन्... शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा 'AI' ट्रेलर घालतोय धुमाकूळ

साप पकडणं तरुणाच्या जीवावर बेतलं

निरखेडा गावाशेजारी नदीकाठी गोंविद गेला असता, त्याला साप दिसला. त्याने सर्प मित्रांप्रमाणेच साप पकडण्याचा प्रयत्न केला, पण तोच प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. त्याने सापाच्या शेपटीला पकडले असता, तरुणाच्या हातावरच सापाने दंश केला. तेव्हाच गोंविद हा जखमी झाला, त्याला अनेकदा वाचवण्याचे प्रयत्न केले, ग्रामस्थांनी उपचारासाठी गोंविदला हॉस्पिटलला नेलं मात्र, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. 

गोविंदच्या मृत्यूनंतर एका सर्प मित्राने सांगितलं की, कुठेही साप आढळला तर जवळच्या सर्प मित्रांना कळवावं, सपाबद्दल ज्ञान नसताना साप पकडण्याचं धाडस करू नये. हे असं धाडस करणं अनेकदा जीवावर बेतण्याची शक्यता आहे. जर साप पकडण्याचं ज्ञान असेल तर धाडस करावं. तरुणाला चावा घेतलेला साप हा विषारी असल्याची माहिती सर्प मित्र गोकुळ लाड यांनी दिली.

हे ही वाचा : गणेश घायवळने पोलिसांना गुंगारा दिला, आधी लंडन, तर आता स्वित्झर्लंडमध्ये जाऊन बसला, गुन्हे दाखल तरीही पासपोर्ट कसा भेटला?

डोंबिवलीत साप चावून चिमुरडीचा मृत्यू

दरम्यान, डोंबिवलीतीस खंबाळपाडा परिसरात एका लहान मुलीला साप चावल्याने लहान मुलीचा मृत्यू झाला. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मुलीला व्यवस्थित उपचार न मिळाल्याने लहान मुलीचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याला दालनात धारेवर धरलं आणि जाब विचारत ठिय्या आंदोलन केलं.

    follow whatsapp