सोनम आणि जितेंद्र कुशवाहा यांच्यातील नात्याबाबत खुलासा, लाखो रुपयांचा व्यवहार झाला उघड

Jitendra Raghuwanshi : हनिमूनवर गेलेल्या राजाच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहासह इतर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत. अशातच देवास येथील रहिवासी असणारे जितेंद्र रघुवंशी यांचाही यामध्ये समावेश असल्याची नवीन माहिती समोर आली.

Jitendra Raghuwanshi

Jitendra Raghuwanshi

मुंबई तक

• 05:11 PM • 13 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिलॉंगमधील राजा रघुवंशी हत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट

point

जितेंद्र रघुवंशीच्या व्यवहारातून लाखो रुपयांचा व्यवहार

Jitendra Raghuwanshi : मेघालयातील शिलॉंगमधील राजा रघुवंशी नावाच्या तरुणाची त्याच्याच नवविवाहित पत्नीने हनिमून दिवशीच हत्या केली आहे. या घटनेत दररोज नवनवीन ट्विस्ट निर्माण होत आहेत. हनिमूनवर गेलेल्या राजाच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहासह इतर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 1206 लकी नंबर ठरला अनलकी, 12-06 ही तारीख माजी मुख्यमंत्र्यांचा ठरला अखेरचा दिवस

याच प्रकरणात आणखी एका नावाची जोरदार चर्चा होत आहे. देवास येथील रहिवासी असणारे जितेंद्र रघुवंशी यांचाही यामध्ये समावेश असल्याची नवीन माहिती समोर आली. दरम्यान, हा जितेंद्र रघुवंशम्हणजे नेमका कोण आहे? सोनमशी याचा संबंध काय आहे? हे जाणून घेऊयात. 

जितेंद्र रघुवंशी कोण? 

जेव्हा प्रसारमाध्यमांनी गोविंद रघुवंशींना जितेंद्र रघुवंशीबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की, जितेंद्र हा सोनमचा चुलत भाऊ आहे. तो पूर्वी गोदामात काम करायचा. गोविंदच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रचं शिक्षण झालेलं नसून त्याचा या व्यवसायाशी कसलाही संबंध नाही. 

गोविंदच्या म्हणण्यानुसार, जितेंद्र रघुवंशी हे त्या गोदामात काम करायचा. गोदामाच्या किरकोळ खर्चासाठी तो बँक खात्याचा वापर करत होता. जसे की, गाडी भाडं, गोदामाच्यासंबंधित आर्थिक व्यवहारासाठी तो बँक खात्याचा वापर करत होता.  त्यांनी सांगितलं की, घटनेची एकूण माहिती ही बनावट आहे. 

हेही वाचा : Ahmedabad Air India Crash: अहमदाबादमध्ये अपघात, महाराष्ट्रावर आघात.. राज्यातील किती जणांनी गमावला जीव?

संबंधित प्रकरणातून माहिती समोर आली की, जितेंद्र रघुवंशीच्या नावाने चार बँक खाती होती. संबंधित चार बँक खाती ही करंट असल्याचे सांगण्यात येत आहे. या बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचं ट्रांजेक्शन करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक खाती राज कुशवाहा आणि सोनम रघुवंशी चालवत होते. या माहितीमुळे घटनेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

    follow whatsapp