Ahmedabad Air India Crash: अहमदाबादमध्ये अपघात, महाराष्ट्रावर आघात.. राज्यातील किती जणांनी गमावला जीव?
Ahmedabad Air India Crash : अहमदाबाद विमान अपघातात राज्यातील क्रू मेंबर्सचा समावेश आहे. या क्रू मेंबर्समध्ये राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांच्या नातेवाईकाचा समावेश आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघाताची दुर्देवी घटना
अपघातात महाराष्ट्रातील क्रू मेंबर्सचा समावेश
Ahmedabad Air India Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघाताची दुर्देवी घटना घडली आहे. एअर इंडियाच्या AI-171 विमानाचा 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी अपघात झाला. या अपघातात एकूण 230 प्रवासी होते, तसेच 12 क्रू मेंबर्सचाही समावेश होता. त्यातील काही क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 142 जणांचा समावेश होता. यातील 141 जणांचा मृत्यू झाला आणि एक प्रवासी वाचला. दरम्यान, या अपघातात महाराष्ट्रातील सहा क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : 'मला जिवंत असल्याचा विश्वासच...' विमान अपघातात बचावलेल्या प्रवाशाने सांगितला घटनाक्रम
अपघातात सुनील तटकरेंच्या नातेवाईकाचा मृत्यू
या क्रू मेंबर्समध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. अर्पणा महाडिक असे त्यांचे नाव असून त्या गोरेगावच्या रहिवाशी आहेत. अर्पणाचे पतीही या क्षेत्रात गेली काही वर्षे काम करत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी माहिती दिली.
बदलापूरचे दीपक पाठक क्रू मेंबरचं निधन
बदलापूरचे दीपक पाठक या एयर इंडियाच्या क्रू मेंबरचाही यामध्ये समावेश होता. त्यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. दीपकचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांनी अपघाताच्या काही वेळाआधी आईसोबत फोनद्वारे संपर्क साधत संभाषण केलं होते, त्यांना स्वप्नातही वाटलं नाही की, असे होईल.
डोंबिवलीतील रोशनी सोनघरे यांचा मृत्यू
राज्यातील तिसऱ्या क्रू मेंबर्सच्या अपघातात रोशनी सोनघरे यांचं नाव समोर आलं आहे. रोशनी या डोंबिवलीच्या रहिवासी आहेत. विमान अपघातात रोशनीच्या निधनाने त्यांच्या कुटुंबात शोक व्यक्त केला आहे.










