ज्योती मल्होत्राच्या तीर्थयात्रेमुळं भारताची सुरक्षा व्यवस्था आली धोक्यात? बैसाखी यात्रेत काय घडलं? वाचा Inside Story

Jyoti Malhotra Latest News Update : पाकिस्तानमध्ये जाऊन हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे.

Jyoti Malhotra Latest News Update

Jyoti Malhotra Latest News Update

मुंबई तक

• 10:11 PM • 19 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती आली समोर

point

बैसाखी यात्रेत ज्योतीने असं काही केलं...

point

बैसाखी महोत्सवादरम्यान पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा केला आणि...

Jyoti Malhotra Latest News Update : पाकिस्तानमध्ये जाऊन हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी ज्योती मल्होत्राची कसून चौकशी केली असून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आध्यत्मिक यात्रेत ट्रॅव्हल व्लॉगिंग करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं प्रकरण डिजिटल युद्ध आणि हेरगिरीच्या मोठ्या प्रकरणात बदललं आहे. ज्योतीने वर्ष 2023 मध्ये बैसाखी महोत्सवादरम्यान पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा केला होता. ज्योतीने भारताची सीमा पार करून इन्फुएन्स ऑपरेशनमध्ये कथितपणे सहकार्य केल्यानं भारतीय एजन्सीने ज्योतीची कसून चौकशी केली आहे. 

हे वाचलं का?

इंडिया टुडेच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन डॉक्युमेंटनुसार, धार्मिक यात्रेत ज्योती मल्होत्राला परकीरत सिंगने मदत केली होती. हरकीरत सिंग एक प्रमुख समन्वयक आहे. जो सिख तीर्थयात्री समुहाला पाकिस्तानला घेऊन जाण्यासाठी मदत करत होता. परकिरतने अशा तीर्थयात्रेचं आयोजनं केलं आहे, ज्या माध्यमातून ज्योती आणि अन्य लोक पाकिस्तानच्या लोकांना भेटले, असा आरोप आहे. 

बैसाखी यात्रा आणि पहिला कनेक्शन

हजारो सिख तीर्थयात्री पाकिस्तानच्या पवित्र स्थळी - ननकाना साहिब, करतारपूर साहिब, पंजा साहिब आणि लाहौरमध्ये गुरुद्वारा डेरा साहिब येथे यात्रा करतात. जे SGPC (शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती) आणि पाकिस्तानच्या इवैक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाच्या माध्यमातून केलं जातं. अशाच एका यात्रेच्या तयारी दरम्यान ज्योतीची पहिली ओळख एहसान उर्फ दानिशसोबत झाली. जो एक पाकिस्तानी वरिष्ठ अधिकारी आहे.

हे ही वाचा >> Mumbai COVID-19 Death: मुंबईत पुन्हा कोरोना आला.. दोघांचा मृत्यू? खरं काय ते समजून घ्या!

ज्याला भारताने 13 मे 2025 ला हद्दपार केलं होतं. एप्रिल 2024 मध्ये 325 व्या बैसाखी महोत्सवासाठी ज्योतीच्या दुसऱ्या यात्रेनं आणखी अडचणी वाढवल्या. ती फक्त पाकिस्तानलाच गेली नाही, तर 17 एप्रिलपासून 25 मे पर्यंत तिथे थांबली. या कालावधीत डिजिटल चॅनेलच्या माध्यमातून संचालित पाकिस्तानी प्रभावी नेटवर्कमध्ये तिची महत्त्वाची भागिदारी समोर आली.

एहसान डार कोण आहे? 

एहसान डार पाकिस्तान हाय कमिशनमध्ये वाणिज्य दुतावास आणि सांस्कृतिक कर्मचारी म्हणून काम करत होता. कोरोना महामारी दरम्यान ज्योतीने एक व्लॉग चॅनेल सुरु केलं होतं. त्यावेळी ती एहसानच्या संपर्कात आली होती. रिपोर्टनुसार, एहसान आणि त्याच्या टीमने ज्योतीला कंटेंट आयडिया आणि मॅसेजिंगचा उपाय सांगितला होता.

हे ही वाचा >> Pune Crime: पुण्याची वाट लागलीय... गाडीला धक्का लागला म्हणून थेट गोळीबार

तिला अशाप्रकारचे टॉपिक दिले, ज्यामुळे पाकिस्तानचं कौतुक होईल आणि सुक्ष्म पद्धतीत भारतावर टीका केली जाईल. डिजिटल साक्ष यांच्यातील एका व्हिडीओची कसून तपासणी केली गेली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ज्योतीने अपलोड केलेले व्हिडीओ भारतीय तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे होते. 

    follow whatsapp