Pune Crime: पुण्याची वाट लागलीय... गाडीला धक्का लागला म्हणून थेट गोळीबार
Pune Crime : पुण्यातील बिबवेवाडीत मध्यरात्री वाहनाला धडक लागल्याच्या कारणावरून गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गाडीला धक्का लागला म्हणून पुण्यातील बिबवेवाडीत थेट गोळीबाराची घटना घडली आहे.

मध्यरात्री हा थरार घडला असून ज्याच्यावर गोळी झाडण्यात आली तो थोडक्यात बचावला गेला.
Pune Crime : पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असे आपण म्हणतो. मात्र, पुण्यात दररोज नव्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातील बीबवेवाडीत दोन वाहनांची धडक लागली. यातूनच वादाला तोंड फुटले अन् थेट गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबाराचा थरार स्थानिकांनी पाहिला. या घटनेमुळे बिबवेवाडीत एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता दोन सराईतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश रवींद्र भालके 21 वय आणि देवा डोलारे वय 22 हे दोघेही बिबवेवाडीतील इंदिरानगर येथील रहिवासी असून ते अटकेत आहेत. अशातच त्यांच्यासह रोहन उर्फ बाळ्या राजू गाडे, ऋषीकेश शिंदे, शंकर ऊर्फ बाबू कैलास पंधेकर, बंटी म्हस्के आणि शैलेंद्र भालके यांच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात बिबवेवाडी पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा : Beed Crime : शिवराज शिवटेला मारहाण, सुरेश धस कडाडत म्हणाले 'त्या मुलांना तर...'
याप्रकरणाची तक्रार ही अमित महावीर लाकडे वय वर्षे 28 या तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात केली. ही घटना रविवारी मध्यरात्री सव्वादोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अप्पर बिबवेवाडीतील डॉ. बाबासाहेब उद्यानानजीक हनुमान मित्र मंडळ चौकात घडली आहे. अक्षय भालकेने तक्रारदार अमित लकडेच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे दोघांमध्ये वादंग निर्माण झाला.
हेही वाचा : RSS हेडक्वॉर्टरवरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 'अज्ञात हल्लेखोराने' पाकिस्तानात संपवलं, काय आहे Inside स्टोरी?
तक्रारदार लकडे हा त्याच्या घराजवळील हनुमान मंदिराच्या परिसरात फेरफटका मारत होता. यावेळी त्या ठिकाणी काही आरोपी आले आणि त्यांनी अमित लकडेची कळ काढली. यामुळे वाद वाढू लागला. अशावेळी लकडेला आरोपींनी पोलिसात तक्रार का दाखल केली? असा प्रश्न केला. तिथे जमलेल्या काही आरोपींनी लकडेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच लकडेवर गोळीबारही करण्यात आला. मात्र, लकडे थोडक्यात बचावला गेला. इतक्यात काहींनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी लकडेचे कुटुंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, मध्यरात्री लकडेला मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आता समोर आली आहेत. ज्यात सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के आणि देवा डोलारे अशी आरोपींची नावे आहेत.