कल्याणमध्ये मोठी कारवाई, 34 कोटींचे हेरॉईन जप्त, पुरवठादाराची ओळख पटली

मिथिलेश गुप्ता

23 May 2026 (अपडेटेड: 23 May 2026, 08:02 PM)

Kalyan Crime : कल्याण परिमंडळ 3 च्या अंमली पदार्थाविरोधात पथकाने कारवाई केली. या कारवाईत पथकाने तब्बल 9 किलो 768 ग्रॅम वजनाचे 34 कोटी 18 लाख 84 हजार रुपयांचे हेरॉईन जप्त केले. पुरठासदारासह एकूण पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश देखील मिळाले आहे.

crime news

Kalyan Drugs case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी ट्रॅप रचत आरोपींच्या आवळल्या मुसक्या 

point

1 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांचे हेरॉईन जप्त 

point

अमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार कोण? 

Kalyan Crime : कल्याण परिमंडळ 3 च्या अंमली पदार्थाविरोधात पथकाने कारवाई केली. या कारवाईत पथकाने तब्बल 9 किलो 768 ग्रॅम वजनाचे 34 कोटी 18 लाख 84 हजार रुपयांचे हेरॉईन जप्त केले. पुरठासदारासह एकूण पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश देखील मिळाले आहे. याच कारवाईमुळे मुंबई-कल्याण या शहारात अंमली पदार्थाचे रॅकेट समोर आले आहे. ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांची ओळख कासिम अब्दुल सत्तार (वय 38), कृष्णा नागप्पा हळेमणी (वय 36), अमजद युसुफ पठाण (वय 47), गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा (वय 71)) आणि सद्दाम सत्तार वसईकर अशी समोर आली. या प्रकरणात सद्दाम गफूर शेख याच्यावर तब्बल 7 गुन्हे दाखल करण्यात आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल

पोलिसांनी ट्रॅप रचत आरोपींच्या आवळल्या मुसक्या 

पोलीस उप आयुक्त परिमंडल 3 यांच्या आदेशानुसार, 1 एप्रिल 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकार्‍यांनी कर्मचारी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत कारवाई केली. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास स्मशानभूमीजवळ सांगळेवाडी रोडनजीक दोन संशयित आरोपींचा पोलिसांनी तपास केला होता. आरोपींच्या मागील असलेल्या बॅगांमुळे आरोपी असल्याचा अधिक संशय बळावला, नंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी तत्काळपणे त्यांना ताब्यात घेत तपासणी केली. संबंधित प्रकरणात 9 किलो 236 ग्रॅम वजनाचे 32 लाख 60 हजार रुपये किंमतीचे हेरॉनईन आणि 39 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आला होता. 

कासिम वसईकरच्या घरातून 1 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांचे हेरॉईन जप्त 

अशातच NDPS कायद्यांतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, आरोपी कासिम वसईकरच्या शाहापूरातील घराची झडती घेतल्यानंतर आणखी 531 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. या हेरॉनईनची किंमत ही सुमारे 1 कोटी 85 लाख 85 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

अमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार कोण? 

या प्रकरणातील सखोल तपासातून या रॅकेटचा मुख्य पुरवठा हा अमजद युसुफ पठाण करत असल्याचे उघडकीस आले. तो कल्याण-नाशिक परिसरातून अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली. अमजद पठाणने आरोपी हणेशन जंगमार उर्फ अण्णा याला हेरॉईन पुरवठा केल्याचे तपासातून निष्पन्न झाले. तर कासिम वसईकर आणि सद्दाम शेख हे दोघेही अमजद पठाणला 1 जून 2026 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

हे ही वाचा :  नागपूर : 'तू ATM मधून पैसे का काढलेस?' रागावलेल्या नातवाने आजीसोबत काय केलं बघा..

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वी देखील खून, दरोडा, शस्त्र कायदा, MCOCA तसेच NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी अमजद पठाण याच्यावर ठाणे, मुंबई, राजस्थान आणि मध्य प्रदेशात अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे आणि सहायक पोलीस अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई केली.