कल्याण: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा धुमाकूळ, हायप्रोफाईल सोसायटीत मारहाण, शिवीगाळ अन्...

मिथिलेश गुप्ता

• 10:35 PM • 09 Apr 2026

कल्याणमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने हायप्रोफाईल सोसायटीत मारहाण करत महिलांशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

kalyan retired police officer goes on a rampage assaults abuses and molests women in high profile residential society

crime news

Google CTA

कल्याण: कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत निवृत्त पोलीस उपायुक्ताने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांशी गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास वल्लभ टॉवर (पौर्णिमा टॉकीजजवळ) येथे राहणारी एक महिला आपल्या लहान मुलासोबत बाहेर जाण्यासाठी दुचाकी पार्किंगमधून काढत होती. यावेळी त्याच सोसायटीत राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. एल. पवार यांनी मुद्दाम आपली कार महिलेच्या गाडीमागे उभी केली.

हे ही वाचा>> अशी बहीण दुश्मनालाही न मिळो, अनैतिक संबंधाला चटावलेली अन्...

महिलेने वारंवार हॉर्न वाजवूनही त्यांनी गाडी बाजूला घेतली नाही. उलट त्यांनी तक्रारदार महिलेकडे अश्लील नजरेने पाहत वाद निर्माण केल्याचा आरोप आहे. यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि आरोपीने महिलेच्या पायावरून गाडी नेल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. तसेच तिला शिवीगाळ करत अपमानास्पद वर्तन केले.

हा वाद पुढे मोठ्या हाणामारीत परिवर्तित झाला. सोसायटीतील इतर रहिवासी घटनास्थळी जमा झाले असता आरोपीने सर्वांनाच अश्लील शिवीगाळ केली. विरोध करणाऱ्या महिलांशी गैरवर्तन करत त्यांच्या विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच विरोध करणाऱ्या पुरुष सदस्यांनाही मारहाण करण्यात आली.

हे ही वाचा>> "तू काळा आहेस, माझ्या लायकीचा नाहीस...", पत्नीला सौंदर्याचा गर्व; अन् हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी

यामध्ये सोसायटीचे सेक्रेटरी यांना कान पकडून मारहाण करण्यात आली, तर चेअरमनला धक्काबुक्की करण्यात आली. तक्रारदार महिलेने आरोपीवर चारित्र्यहनन करणारे अत्यंत खालच्या पातळीवरील शब्द वापरल्याचीही तक्रार केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.