Kolhapur Accident : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील खुटाळवाडी गावानजीक मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांचा भीषण अपघात झाला. ऊस भरून जाणाऱ्या वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकी चालक आणि त्याच्या साथीदाराचा अंत झाला आहे. तरुण हा सैन्य भरतीसाठी जात असतानाही ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत तरुणांची नावे आता समोर आली आहे. पारस आनंदा परीट (वय 19) आणि सुरज ज्ञानदेव उंड्रीकर (वय 20) अशी तरुणांची नावे समोर आली आहेत शाहूवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 12 वर्षांनंतर, गुरु आणि मंगळाची झाली शुभ युती 'या' राशीतील लोकांना कधीच पडणार नाही पैशांची कमी
'असा' घडला अपघात
घटनास्थळावरून तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबर्डे येथील पारस परील व सुरज उंड्रीकर हे दोघेजण कोल्हापूरला सैन्य भरतीसाठी शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी गेले होते. रविवारी 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या आंबर्डे गावी परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.
ऊसाने भरलेल्या वाहनाने मोटारसायकलला दिली ठोकर
बांबवडे येथील खुटाळवाडी गावाच्या हद्दीतील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या दिशेने ऊसाने भरलेले एक वाहन येते होते. तेव्हा त्या वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे.
ऊसाने भरलेल्या वाहनाने दिलेली धडक इतकी जोराची होती की, दोन्ही युवकांच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाल्याचे समजले. या धडकेत तरुणांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह छिन्न-विछिन्न स्वरुपात पडलेला होता.
हे ही वाचा : झोपेत असतानाच काळाचा घाला, बस डिझेलच्या टँकरला धडकली, सौदी अरेबियात 42 भारतीयांचा मृत्यू
इतक्यातच ऊस भरलेल्या वाहनाचा ड्रायव्हर तिथून पळून गेला. इतक्यातच नागरिकांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. संबंधित अपघाताची माहिती मिळताच, हायवे पोलीस आणि शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृत तरुणांना मलकापूर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.
ADVERTISEMENT











