कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले, अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली

kolhapur crime news : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 19 वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चार जणांनी तब्बल 8 महिने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला.

kolhapur crime news

kolhapur crime news

मुंबई तक

04 Jun 2026 (अपडेटेड: 04 Jun 2026, 12:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले,

point

अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली

kolhapur crime news : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत धडकणार?

आदित्य शेटके याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं 

या प्रकरणात मुख्य आरोपी आदित्य शेटके याने ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने तरुणीशी ओळख वाढवली. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधांमध्ये रूपांतर झाले. मात्र या नात्याच्या आडून तरुणीचा गैरफायदा घेण्याचा कट रचला गेला. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तिला बोलावून घेतल्यानंतर तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्यात आली आणि त्याचवेळी तिचे काही आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढण्यात आल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : चार निष्पाप मुलांच्या समोर आई रक्ताच्या थारोळ्यात, अन् भयंकर घडलं!

लॉज, कार आणि झाडीत नेऊन अत्याचार 

या व्हिडिओंचा आधार घेत आरोपीने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणण्यात आला. यानंतर आरोपीने केवळ स्वतःच तिचा गैरफायदा घेतला नाही, तर तिला इतर व्यक्तींशीही संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आला आहे. आदित्य शेटके याने तरुणीची ओळख रणजीत संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली. रणजीतनेही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला कोल्हापूर आणि पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रवणगिरी चंद्रशेखर पालकर याच्याशी ओळख करून देण्यात आली. त्यानेही धमकीच्या जोरावर तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी विक्रम रामचंद्र पाटील याने तरुणीला सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून प्रकरण मिटवण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानेही तिला पाचगाव परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेल्या दहा महिन्यांपासून चारही आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. याशिवाय प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणीही करण्यात आली होती. भीतीपोटी पीडितेने काही आरोपींना पैसे दिल्याचेही समोर आले आहे. तरीही तिचा छळ सुरूच राहिला. विक्रम पाटील याने तरुणीला लग्नाची अट घालत फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

अखेर सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आदित्य शेटके (24), प्रवणगिरी पालकर (24), विक्रम पाटील (22) आणि रणजीत मुधोळकर (29) या चारही आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी राधानगरी परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींच्या चौकशीतून आणखी काही माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.