Kolhapur Leopard Attack : राज्यात काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतात काम करताना काही शेतकऱ्यांना आपल्या गळ्याला काटेरी पच्चा परिधान केलेला दिसून येत आहे. अशातच आता कोल्हापूरातील विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्याने उच्छाद केला आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटच्या सुमारास बिपट्या शहराच्या विविध भागांमध्ये हिंडताना दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता या बिपट्याने एका पोलीस अधिकाऱ्यावरही हल्ला केल्याचा व्हिडिओ काही माध्यमांनी शेअर केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांचे आयुष्य धोक्याचे, काय सांगतंय राशीभविष्य?
पोलिसांवर बिबट्याचा हल्ला, Video Viral
या घटनेदरम्यान काही वाहनधारकांना बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडल्याचे चित्र आहे. अशातच आता नागरिक, वनविभागाचे कर्मचारी अधिकारी शहरातील बिबट्याचा शोध घेत आहेत. कोल्हापूरातील विवेकानंद कॉलेज परिसरालगत असलेल्या नागाळा पार्क येथे आता बिबट्याने पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परिसर पूर्णपणे सील
या घटनेनं वनविभागाने परिसर पूर्णपणे सील करून टाकला आहे. कॉलेज परिसर, वूडलँड हॉटेल, बीएसएनएल आणि महावितरण या परिसरात या सर्वच ठिकाणी बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. अशातच आता परिसरातील रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, तसेच रात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, तेजस्वी घोसाळकरांना धक्का; तुमच्या वार्डाची स्थिती काय?
दरम्यान, हा बिबट्या कोठून आला याबाबत अघापही कसलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. काहींचे म्हणणं आहे की, आजूबाजूच्या जंगलातून किंवा पंचगंगा नदी काठाच्या भागातूनच शहरात शिरल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











