मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, तेजस्वी घोसाळकरांना धक्का; तुमच्या वार्डाची स्थिती काय?

मुंबई तक

Mumbai Mahapalika Ward Reservation : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, घोसाळकरांना धक्का; तुमच्या वार्डाची स्थिती काय?

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika Ward Reservation
Mumbai Mahapalika Ward Reservation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

point

घोसाळकरांना धक्का; तुमच्या वार्डाची स्थिती काय?

Mumbai Mahapalika Ward Reservation : मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC Election 2025) बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे आज (दि.11) सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ही सोडत काढण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील. तर अनुसुचित जातींसाठी एकूण 15 वॉर्ड राखीव असतील यामध्ये अनुसुचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी 8 वॉर्ड आरक्षित असतील. तर अनुसुचित जमातीसाठी दोन वॉर्ड राखीव असतील त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण असेल. तर ओबीसींसाठी मुंबईतील 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये 31 महिला ओबीसी उमेदवारांची समावेश असेल. तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या 31 महिला उमेदवारांचा समावेश, असेल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. दिनांक 14 नोव्हेंबर ते गुरुवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

एकूण सदस्यसंख्या 227

महिलांसाठी राखीव 114

हे वाचलं का?

    follow whatsapp