Ritu Karidhal: ‘चांद्रयान-3’ चे कणखर नेतृत्व करणारी ही ‘रॉकेट वुमन’ आहे तरी कोण?

रोहिणी ठोंबरे

14 Jul 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 10:07 AM)

आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. आज भारत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 लाँच करेल. चांद्रयान-3 च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत.

Mumbai Tak
Google CTA

Chandrayaan-3 : Ritu Karidhal : आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. आज भारत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 लाँच करेल. चांद्रयान-3 च्या (Chandrayaan-3) लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘रॉकेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतराळ शास्त्रज्ञ रितू करीधल श्रीवास्तव (Ritu Karidhal Shrivastava) या मिशनचे नेतृत्व करत आहेत. ज्यांच्यावर या महत्त्वाच्या मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या रितू करिधल आहेत तरी कोण? हे सविस्तर जाणून घेऊयात. (Lucknow’s Rocket Woman Ritu Karidhal will lead Chandrayaan-3 mission Get Know About Her)

हे वाचलं का?

लखनौची ‘रॉकेट वुमन’ करणार चांद्रयान-३ मोहिमेचे नेतृत्व!

चांद्रयान-3 उतरवण्याची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ रितू करीधल श्रीवास्तव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टरच्या भूमिकेत रितू करीधल दिसणार आहे. लखनौमध्ये राहणाऱ्या आणि मंगळयान मोहिमेत आपले कौशल्य दाखविणाऱ्या रितू चांद्रयान-3 सह यशाचीही उंच भरारी घेणार आहेत. रितू यांना त्यांच्या आधीच्या मिशनमधील भूमिका लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे.

वाचा : रश्मी वहिनीसमोरच बोललो, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’तला प्रचंड इंटरेस्टिंग किस्सा

रितू या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. लखनौच्या रितूंनी जेव्हा चांद्रयान-मिशन 2 मध्ये मिशन डायरेक्टरची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

रितू करिधल यांची कारकीर्द

लहानपणापासून रितू करीधल लखनौमध्येच मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी केले आहे. विज्ञान आणि अवकाशातील आवड पाहून रितूंनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी इस्रोमध्ये नोकरीला सुरुवात केली. एरोस्पेसमध्ये पारंगत असलेल्या रितूंचे करिअर यशांनी भरलेले आहे.

वाचा : अ‍ॅपमुळे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, तुमचं कुटुंब असं उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर….

त्यांना 2007 मध्ये यंग सायंटिस्ट अवॉर्डही मिळाला आहे. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी देशातील आघाडीच्या अवकाश शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव येते. त्यांना ‘रॉकेट वुमन’ असेही म्हणतात.

रितूने नवयुग गर्ल्स कॉलेजमधून शालेय शिक्षण घेतले. तर लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी घेतली. 6 महिने संशोधन केल्यानंतर त्यांनी गेट परिक्षा पास केली. रितूंनी 1997 मध्ये इस्रोसोबत काम करायला सुरुवात केली.

अनेक मोहिमांमध्ये रितू करीधल यांची महत्त्वाची भूमिका!

रितू करिधल यांनी मिशन मंगलयान आणि मिशन चांद्रयान-2 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना लहानपणापासूनच अंतराळ आणि अवकाश शास्त्रात रस होता. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी त्यांच्या कामगिरीइतकीच मोठी आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट अवॉर्ड, मार्स आर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अचिव्हमेंट अवॉर्ड हे रितूंना देण्यात आले आहेत.

वाचा : मुंबई Takचावडी: ‘शरद पवारांनी हात जोडले तरी…’, अजित पवारांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरातांच मोठं विधान

चांद्रयानमध्ये यंदा ऑर्बिटर पाठवलं जाणार नाही कारण…

यावेळी चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जात नाहीये. स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याला ऑर्बिटर म्हटले जात नाही कारण तो चंद्राचा अभ्यास करणार नाही. त्याचे वजन 2145.01 किलोग्रॅम असेल, त्यापैकी 1696.39 किलो इंधन असेल. याचाच अर्थ मॉड्यूलचे वजन 448.62 किलो आहे.