कल्याण : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स.. 'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा

डोंबिवलीतील प्रसिद्ध रीलस्टार सुरेंद्र पाटील यांना अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वी ते जामीनावर बाहेर आले होते. यामागे कोणता मोठा कट होता का? याविषयी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Dombivali Crime

Dombivali Crime

मिथिलेश गुप्ता

• 11:06 AM • 31 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवली : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स..

point

'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा

Dombivali Crime : डोंबिवली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर ‘गँगस्टर स्टाईल’ व्हिडिओमुळे प्रसिद्ध असलेले ‘रील स्टार’ सुरेंद्र पांडुरंग पाटील यांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. 55 वर्षीय पाटील हे बिल्डर असून त्यांच्यावर यापूर्वीही बलात्कारासह इतर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच ते एका प्रकरणात जामिनावर बाहेर आले होते. मात्र अवघ्या दोन आठवड्यांतच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

शू रॅकमध्ये लपवला शस्त्रसाठा

गुप्त माहितीनुसार, ठाणे क्राईम ब्रांचने शनिवारी मध्यरात्री दावडी येथील त्यांच्या बंगल्यावर छापा टाकला. तपासादरम्यान घरातील शू रॅकमध्ये एक गुप्त कप्पा आढळून आला. त्या कप्प्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लपवून ठेवलेला होता. या कारवाईत पोलिसांनी 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे आणि 167 एअर गनच्या गोळ्या जप्त केल्या.

हे ही वाचा : मुंबईची खबर : आता महापालिकेच्या रुग्णालयातही मिळणार आयव्हीएफ उपचार, लवकरच अंतिम निर्णय

 

'मेड इन युएसए'

याशिवाय तलवार, चाकू, कोयते आणि इतर धारदार शस्त्रेदेखील जप्त करण्यात आली. या शस्त्रांची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या बंदुकांपैकी 5 देशी पिस्तुल आणि रिव्हॉल्वर असून काहींवर ‘Made in USA’ आणि ‘Special Auto’ अशी नक्षी आढळली आहे. हा संपूर्ण शस्त्रसाठा वापरासाठी तयार स्थितीत होता, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : अशोक खरातच्या अश्लील Video मुळे 'ती' भीती... पीडितेच्या कुटुंबीयांना मागितलं Work from Home

 

मोठा कट होता का?

सुरेंद्र पाटील यांचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून ते या शस्त्रांचा वापर व्हिडिओमध्ये ‘प्रॉप्स’ म्हणून करत असल्याचा दावा करत आहेत. मात्र पोलिस या दाव्याची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणी पाटील यांच्यावर आर्म्स अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले आहे. शस्त्रसाठा कुठून आला? यामध्ये कोणाचा हात आहे? या मागे मोठा कट होता का? याविषयी पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मते, सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अवैध शस्त्रांचा वापर करण्याची धोकादायक प्रवृत्ती या घटनेतून समोर आली आहे.