नागपूर : फायनान्स एजंटला घरात घुसून संपवलं, 15 दिवसांपूर्वी आईचा मृत्यू अन्.. नेमकं कारण काय?

योगेश पांडे

• 10:56 AM • 17 May 2026

एका अज्ञात आरोपीने फ्लॅटमध्ये घुसून 40 वर्षीय फायनान्स कंपनीचे एजंट अजय श्रीवास यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. याप्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी देखील केली, मात्र त्याला पकडण्यात यश आले नाही.

Nagpur Crime

Nagpur Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर : फायनान्स एजंटला घरात घुसून संपवलं,

point

15 दिवसांपूर्वी आईचा मृत्यू अन्..

point

नेमकं कारण काय?

Nagpur Crime : नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स परिसरातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. येथील गौरखेडे कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी (16 मे) दुपारी एका हत्येच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. एका अज्ञात आरोपीने फ्लॅटमध्ये घुसून 40 वर्षीय फायनान्स कंपनीचे एजंट अजय श्रीवास यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. प्रॉपर्टीचा वाद किंवा जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

15 दिवसांपूर्वी आईचं निधन अन्..

अजय श्रीवास एका फायनान्स कंपनीत एजंट म्हणून कार्यरत होते आणि सोबतच प्रॉपर्टी डीलिंगचे कामही करायचे. कौटुंबिक वादामुळे गेल्या 10-12 वर्षांपासून त्यांची पत्नी वेगळी राहत होती. तेव्हापासून अजय आपल्या आईसोबत राहत होते. 15 दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते, त्यानंतर ते फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते.


शनिवारी (16 मे) दुपारी अजय यांनी आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर ते आपल्या प्रॉपर्टी डीलिंगच्या कार्यालयात गेले. तिथून परतल्यानंतर ते आपल्या फ्लॅटमध्ये आराम करत होते, याच दरम्यान एक व्यक्ती त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसली आणि चाकू मारून अजय यांची हत्या करून फरार झाली.

हे ही वाचा : बीड : तरुणीनं भररस्त्यात मारली थोबाडीत, तरुणानं वडिलांना फोन केला अन्...

चाकूने सपासप वार

शनिवारी दुपारी 3 ते 3:30 च्या दरम्यान अज्ञात हल्लेखोर फ्लॅटमध्ये घुसले आणि त्यांनी अजय यांच्यावर चाकूने सपासप वार केले. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी फरार झाले. घटनेच्या काही वेळानंतर जेव्हा अजय यांचा एक नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी फ्लॅटवर पोहोचला, तेव्हा आतील दृश्य पाहून त्याचे धाबे दणाणले. जमिनीवर अजय यांचा रक्ताने माखलेला मृतदेह पडला होता. नातेवाईकाने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे शेजारी जमा झाले आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

हे ही वाचा : धुळे : धार्मिक पूजन झाले अन् अक्षय, जयश्रीचा जीवच गेला; भोंदू बाबाने काय केले?

आरोपी कोण?

गिट्टीखदान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. शहरभर नाकेबंदीही करण्यात आली, मात्र सध्या कोणताही संशयित पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस मृतकाच्या नातेवाईक, मित्र आणि परिचितांचीही चौकशी करत आहेत.