'सध्या फक्त ट्रेलर दाखवलाय..' लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुण्यातील मॉलवर गोळीबार, कुणाला दिली वॉर्निंग?

पिंपरी-चिंचवडमधील एका मॉलवर दोन अज्ञातांनी गोळीबार केला आहे. यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Pune Mall Firing by Lawrence Bishnoi Gang

Pune Mall Firing by Lawrence Bishnoi Gang

मुंबई तक

16 May 2026 (अपडेटेड: 16 May 2026, 10:06 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'सध्या फक्त ट्रेलर दाखवलाय..'

point

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुण्यातील मॉलवर गोळीबार

point

कुणाला दिली वॉर्निंग?

Pune Mall Firing by Lawrence Bishnoi Gang : पुण्यात पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्या 'एजे फर्निचर मॉल'वर (AJ Furniture Mall) दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

हे वाचलं का?

या पोस्टमध्ये मॉलचे मालक अशोक नयन यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 'एजे फर्निचर मॉल'वर अचानक गोळीबार सुरू केल्याने एकच खळबळ उडाली. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ आणि पळापळ झाली. घटनेनंतर आरोपी तात्काळ फरार झाले. ही संपूर्ण घटना मॉलच्या बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामध्ये दोन तरुण दुचाकीवरून येताना आणि गोळीबार करताना दिसत आहेत.

हे ही वाचा : धुळे : बायकोसमोर रागावल्याने मुलगा संतापला, डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची हत्या

गोळीबारांनतर सोशल मीडियात पोस्ट

गोळीबारानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, जी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरची असल्याचे सांगितले जात आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मॉल मालक अशोक नयन यांना आधी समजावण्यात आले होते, परंतु "पैशाच्या घमेंडीमुळे" त्यांनी ऐकले नाही. पोस्टमध्ये पुढे असेही लिहिले आहे की, "सध्या फक्त ट्रेलर दाखवला आहे, पुढची गोळी थेट डोक्यात मारू." एवढेच नाही तर या पोस्टमध्ये 'वीर फर्निचर'शी संबंधित मुकेश सहराना नावाच्या व्यक्तीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

हे ही वाचा : फडणवीसांचा राखीव प्रवर्गाबाबतचा 'तो' निर्णय वादात का आलाय? टीकेचा सूर, माजी खासदार भडकले...

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

सोशल मीडियावर समोर आलेल्या या धमकीनंतर पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी पुरावे गोळा केले आहेत. तर पिंपरी-चिंचवड पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया पोस्टच्या आधारे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात अत्यंत निर्धास्तपणे आले आणि अवघ्या काही सेकंदात गोळीबार करून फरार झाले. या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

हे ही वाचा : वडील बाहेर गेले, चुलत भावाला पोत्यात काहीतरी दिसलं, अन्... भयंकर कांड उघडकीस

लॉरेन्सच्या भावाची ऑडियो क्लिप व्हायरल

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोईच्या नावाने एक कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये म्हटलंय की की, "जे आमच्या विरोधात आहेत, त्यांची आणि आमची भेट लवकरच होईल." या कथित संदेशाच्या माध्यमातून धमकीही देण्यात आली आहे. मात्र, हा ऑडिओ खरोखरच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे की नाही,याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.