रुग्णालयात बाईकने एन्ट्री, 7.30 चा टायमर आणि आरोपीचा सीसीटीव्ही; पुण्यात बॉम्ब कोणी ठेवला?

पुण्यातल्या हडपसरमध्ये जो काही प्रकार घडला, ज्यामध्ये कमी तीव्रतेचा बॉम्ब आढळून आला; त्या प्रकरणातील संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

IED Found in Hadapsar

IED Found in Hadapsar

ओमकार वाबळे

• 01:41 PM • 14 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुग्णालयात बाईकने एन्ट्री

point

7.30 चा टायमर

point

आरोपीचा सीसीटीव्ही

point

पुण्यात बॉम्ब कोणी ठेवला?

IED Found in Hadapsar : पुण्यातल्या हडपसरमध्ये जो काही प्रकार घडला, ज्यामध्ये कमी तीव्रतेचा बॉम्ब आढळून आला; त्या प्रकरणातील संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये तो संशयित व्यक्ती ओला या इलेक्ट्रिक बाईकवरुन आला होता. हडपसरमधील तेजस कामधेनू इस्टेट सोसायटीसमोर उषाकिरण हॉस्पिटलमध्ये काल रात्री हा बॉम्ब सापडला. कालपासूनच याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सगळ्या यंत्रणा सध्या अलर्टवरती आहेत. 

हे वाचलं का?

काल रात्री नेमकं काय घडलं?

उषाकिरण हे चार मजल्याचं हॉस्पिटल आहे. काल संध्याकाळी सातच्या दरम्यानची ही घटना आहे. या प्रकरणातील संशयित व्यक्ती या हॉस्पिटलमध्ये आला आणि एका वॉशरुममध्ये हा बॉम्ब ठेऊन दिला. यानंतर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचारी वॉशरुममध्ये गेल्यानंतर त्यांना एक वस्तू सापडली. याची माहिती त्यांनी डॉक्टरना दिली. डॉक्टर याच हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर राहतात. माहिती कळताच ते लगेच खाली आले. त्यांना समजलं की ही वस्तू काहीतरी संशयास्पद आहे. म्हणून त्यांनी पोलिसांना फोन केला. मात्र त्याआधी त्यांना कळलं की ही वस्तू एक स्फोटक आहे. त्यांनी हे स्फोटक एका बॉक्समध्ये भरुन पार्किंगमधील मोकळ्या जागेत ठेवलं. त्यानंतर दहाच मिनिटात पोलीस दाखल झाले. 

 

हे ही वाचा : ड्रायव्हर अन् कंडक्टरने महिलेला ओढलं अन्.., स्लीपर बसमध्ये नेमकं काय घडलं?

काय होती बॉम्बची रचना?

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, हे स्फोटक म्हणजे आयईडी आहे. विहिरी किंवा खाणींमध्ये खडक फोडण्यासाठी वापरतात इतकं मोठं ते स्फोटक नव्हतं. यामध्ये जिलेटीनच्या कांड्या असतात. त्याला डेटोनेटर्स जोडलेले असतात. त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केला जातो. हा करंट पास झाल्यानंतरच तो स्फोट होतो. यामध्ये महत्त्वाचं हे आहे की, हे जरी कमी तीव्रेतचं स्फोटक असलं तरीसुद्धा त्यावर टायमर लावला होता. त्याला वायरिंग केलं होतं आणि त्याला डेटोनेटर्स सेट केले होते. शहरात दाट वसाहत असलेल्या परिसरात ही घटना घडली. या टायमरवर 7.30 अशी वेळ होतो.  याचा साधारणत: साडेसात तासांनी स्फोट झाला असता. मुद्दा असा आहे की, इतक्या वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने संशय तयार झाला. यामुळे सगळी यंत्रणा अलर्टवर आहे.

हे ही वाचा : बीड : थरकाप उडवणारा व्हिडीओ, 4 वर्षीय चिमुरड्यावर भटके कुत्रे तुटून पडले

'इथे' नष्ट करण्यात आले स्फोटक

स्फोटक सापडलं ते ठिकाण आता पोलिसांनी सील केलेलं आहे. एटीएस, पुणे क्राइम ब्रँच आणि हडपसरचे स्थानिक पोलीस मिळून या घटनेचा तपास करत आहेत. हडपसरला असलेल्या एका ग्लायडिंग सेंटरमध्ये असलेल्या मोठ्या जागेत नेऊन हे स्फोटक नष्ट करण्यात आले. मात्र यामागे काही घातपाताचा कट होता का या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, हे कमी तीव्रतेचं स्फोटक आहे. तरी इतकं मोठं धाडस केलं कुणी आणि कशासाठी हा प्रश्न आहेच. 

हे ही वाचा : पुणे : रुग्णालयात सापडला जिवंत बॉम्ब, पुणेकरांमध्ये घबराट; सीसीटीव्हीत काय दिसलं?

हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

दरम्यान, पोलिसांनी या घटनेच्या तपासाचा वेग वाढवला असून, उषाकिरण हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या अंगाने चौकशी सुरू केली आहे. संशयित व्यक्ती एमआर (Medical Representative) म्हणून हॉस्पिटलमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील कोणत्या कर्मचाऱ्याने त्याला मदत केली का, किंवा त्या व्यक्तीला बॉम्बसदृश वस्तू ठेवण्यास सांगितले होते का, या दृष्टीने तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील पथक करत आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जात असून, त्यांची सखोल पडताळणी केली जात आहे.