ADVERTISEMENT
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, 2 जानेवारी 2026 रोजी राज्यातील हवामान सामान्यतः कोरडं राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सामान्यत: 2 ते 4 अंश सेल्सिअसहून कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळ आणि रात्री थंडीची लाट अनुभवता येण्याची आहे.
हे ही वाचा : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीनं उधळला विजयी गुलाल, भाजपसह शिवसेनेचे 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी
कोकण विभाग :
कोकण विभागात कोरडं वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागांमध्ये थंडीचा सौम्य परिणाम जाणून येईल. तसेच मुंबईमध्ये 2 जानेवारी रोजी आकाश निरभ्र राहण्याची चिन्हे आहेत. शहरात तापमान हे सुमारे 39 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रात्री हलक्या प्रमाणात गारवा जाणवेल अशी शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक आहे. तसेच याच विभागातील शहरात कमाल तापमान हे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच पहाटेच्या वेळी धुक्याची दाट शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडीचा जोर कामय टिकून राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. याच विभागातील छत्रपती संभाजीनगर शहरात कमाल तापमान हे 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पुण्यात पतीनं झोपेचं सोंग घेतल्याचा पत्नीचा आरोप, रागाच्या भरात पतीवर उकळता चहाच ओतला, अख्खा चेहरा भाजला
विदर्भ :
विदर्भातील तापमान हे किंचित वाढ जाणवत असली तरीही थंडावा कायम राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहणार असून गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 8 अंशापर्यंत घसरल्याने गारव्यात अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











