नांदेड हळहळलं! "आई, बाबा तुमची आठवण..." इंस्टावर भावनिक पोस्ट आणि 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या

एका महाविद्यालयीन तरुणाने किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील पाण्याच्या टाकीजवळ पळसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. पीडित तरुणाने इंस्टाग्रामवर आपल्या आई-वडिलांची आठवण येत असल्याची भावनिक पोस्ट टाकून हे टोकाचं पाऊल उचललं.

20 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

20 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

• 12:31 PM • 01 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टावर भावनिक पोस्ट करून तरुणाची आत्महत्या...

point

नांदेडमध्ये 20 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

Nanded Suicide Case: नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणाने किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील पाण्याच्या टाकीजवळ पळसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. पीडित तरुणाने इंस्टाग्रामवर आपल्या आई-वडिलांची आठवण येत असल्याची भावनिक पोस्ट टाकून हे टोकाचं पाऊल उचललं. संबंधित तरुणाचं नाव रानोजी विलास ऐनवलेवाड (20) असून त्याचे आई-वडील तेलंगणा राज्यात कामासाठी गेले होते. तसेच, रानोजी नांदेड येथे बी.एस्सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. 

हे वाचलं का?

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाची भावनिक पोस्ट... 

रानोजी आपल्या भावासोबत राहत असून त्याने बुधवारी (31 डिसेंबर) त्याच्या भावाला नांदेडच्या इस्लापूर येथे जायचं असल्याचं सांगितलं आणि त्याला त्याच्या भावाने तिथे सोडलं. त्यानंतर, पुन्हा सहस्त्रकुंड येथे परतला आणि पाण्याच्या टाकीजवळ पळसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी, पीडित तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये रानोजीने म्हटलं की, "आई, बाबा आज तुमची खूप आठवण येतेय, मी घरी आहे आणि तुम्ही इथे नाही आहात. लवकर या, मी वाट बघेन तुमची." ही पोस्ट टाकल्याच्या दोन तासांनंतर रानोजीने टोकाचं पाऊल उचललं. 

हे ही वाचा: पतीला त्याच्या वहिनीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् विरोध करताच महिलेसोबत घडलं भयंकर...

पोलिसांनी दिली महिती 

संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. 

हे ही वाचा: कोल्हापूर : शेकोटीसाठी रस्त्याच्या बाजूला थांबले, इनोव्हा कार आली चिरडून गेली, तावडे हॉटेल चौकात तिघांचा मृत्यू

संबंधित घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. रानोजीने आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप उघडकीस आलं नसून पोलीस याचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp