Maharashtra Weather : राज्यात डिसेंबर महिन्यात हिवाळ्याच्या सुरुवातीला हवामान सामान्यतः कोरडे, उष्ण राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर विश्वसनीय स्त्रोतांच्या आधारावर तापमान सामान्यत: 17 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे, 2 डिसेंबर रोजी हवामानाचा एकूण अंदाज जाणून घ्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'माझ्यासाठी तो धर्म..' नांदेड हत्या प्रकरणात सक्षमच्या वाढदिवशी प्रेयसी आंचलकडून धक्कादायक खुलासे, पोलिसांचंही कनेक्शन सांगितलं
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी मुंबईत कमाल तापमान 31 तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि पुणे घाट परिसरात थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरडं वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. 12 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊन तापमान घट निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : अनगर निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना खरंच धक्का? खरं कारण हे आहे...
विदर्भ विभाग :
विदर्भात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे. अमरावतीसह संपूर्ण विदर्भात देखील गारवा जाणवेल.
ADVERTISEMENT











