'माझ्यासाठी तो धर्म..' नांदेड हत्या प्रकरणात सक्षमच्या वाढदिवशी प्रेयसी आंचलकडून धक्कादायक खुलासे, पोलिसांचंही कनेक्शन सांगितलं
Nanded Crime : सक्षमचा आज 1 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे, याचपार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना तिने आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सक्षमचा आज 1 डिसेंबर रोजी वाढदिवस
तरुणीच्या डोळ्यात पाणी आलं अन् आठवणींना दिला उजाळा
Nanded Crime : नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीचे आंतरजातीय तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळताच, तिच्या वडीलांनी तरुणावरच गोळीबार करत संपवलं. या घटनेनंतर तरुणीने स्वत: सक्षमच्या मृतदेहाला हळद लावत विवाह केला. या घटनेनं आता नांदेड हादरून गेलं आहे. तरुणीचे नाव आंचल मामिलवाड़ आणि मृत तरुणाचे नाव सक्षम ताटे असे आहे. ही घटना नांदेडमधील जूनागंज परिसरात 27 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणात आता आंचलने सक्षमच्या हत्येच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
हे ही वाचा : काँग्रेसच्या प्रचारासाठी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा रोड शो, Videoची होतेय चर्चा
नांदेडमध्ये सक्षम ताटेची हत्या
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी वडील गजानन मामिलवाड़, भाऊ सोहेल मामिलवाड़, भाऊ हिमेश मामिलवाड़ आरोपींनी गोळीबार केला. तसेच आणखी एका आरोपीने तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीने मृतदेहासोबत विवाह केला आणि त्या मृतदेहाला हळद लावली. मृताच्या कुटुंबाने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या भयंकर घटनेनं राज्य हादरून गेलं आहे.
सक्षमचं स्वप्न मी पूर्ण करणार - आंचल मामिवाडा
दरम्यान, आंचल मामिलवाडचे गेल्या तीन वर्षांपासून सक्षम ताटेसोबत प्रेमसंबंध होते. तो सारखा तिच्या घरी यायचा, तरुणी ही बीएससीच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होती. सक्षमचे देखील अधिकारी होण्याचे स्वप्न होते. तो तिला अभ्यासात मदत करायचा. तो नेहमीच म्हणायचा, 'जर तू माझ्याकडे लक्ष दिलेस तर मी तुला कधीच सोडून जाणार नाही, आता तो गेला आहे आता त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार', असं आंचल मामिवाडा म्हणाली.
'तो माझ्यासाठी हिंदू धर्म स्वीकारणार होता'
पुढे बोलताना आचल म्हणाली की, 'तो माझ्या वडिलांचा नेहमी आदर करायचा. त्याने माझ्याशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते, तो सर्वांना विश्वासात घेऊनच विवाह करणार होता. परंतु आमच्या प्रेमाबाबत कळाल्यानंतर, माझ्या कुटुंबाने मला मारहाण केली आणि लग्नासाठी विरोध दर्शवला होता'. एवढंच नाहीतर आंचलने एक धक्कादायक खुलासा केला की, 'तो माझ्यासाठी हिंदू धर्म स्वीकारणार होता'.










