काँग्रेसच्या प्रचारासाठी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा रोड शो, Videoची होतेय चर्चा
Gautami Patil : चंद्रपूरात नृत्यांगणा गौतमी पाटील हिने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात काँग्रेसच्या रोडशोमध्ये दि : 1 डिसेंबर रोजी प्रचार केला आहे. या प्रचार रॅलीत नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटीलचा रोड शो
काय म्हणाली गौतमी पाटील?
Gautami Patil : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरु आहे. ही निवडणूक अनेक रंगांनी चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच आता नृत्यांगणा गौतमी पाटील हिने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात काँग्रेसच्या रोडशोमध्ये दि : 1 डिसेंबर रोजी प्रचार केला आहे. या प्रचार रॅलीत नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती. गौतमीचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. याचमुळे आता गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
हे ही वाचा : अनगर निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना खरंच धक्का? खरं कारण हे आहे...
काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटीलचा रोड शो
काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटीलने रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. तसेच चंद्रपूरच्या मूल शहरातील हा व्हिडिओ सध्या जोराचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आपुलकी दाखवताना दिसत आहे. तसेच सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी तिच्याभोवती मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावर तिने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली गौतमी पाटील?
प्रचार रॅली सुरु असताना ती म्हणाली की, 'प्रेक्षकांकडून दरवेळी प्रेम मिळते. मी सर्विकडेच जाते आणि सर्वत्र मला छान भरभरून प्रतिसाद मिळतोय', असं म्हणत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एवढंच नाहीतर गौतमी पाटीलने विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत तिनं अनेक ठिकाणी प्रचार केल्याचं सांगितलं आहे.
हे ही वाचा : जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या, हल्ल्यामागे पडळकरांचे कार्यकर्ते?
आधी राष्ट्रवादीच्या गाण्यावर थिरकली होती
दरम्यान, गौतमी पाटील हिने यापूर्वी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाण्यावर देखील नृत्य केलं होतं. त्यानंतर आता ती काँग्रेसच्या प्रचार रॅलीत उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहे.










