जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या, हल्ल्यामागे पडळकरांचे कार्यकर्ते?

मुंबई तक

sangli news : जतमध्ये अजितदादांच्या उमेदवाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. प्रचार सुरु असताना ही घटना घडली आहे, या हल्ल्यामागे भाजप असल्याचा संशय असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.

ADVERTISEMENT

sangli news
sangli news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक

point

पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरु 

Sangli Politics : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार सुरु आहे. अशातच आता सांगलीतील जतमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रचाराच्या शेवटच्याच दिवशीच या निवडणुकीला हिंसक वळण लागल्याचं चित्र आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण तापलं. जत नगरपरिषद निवडणूक प्रचाराचाही आज शेवटचा दिवस असून जतमध्ये प्रचाराला हिंसक वळण मिळालेले आहे. जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.

हे ही वाचा : मुंबईत भररस्त्यात परप्रांतियाकडून महिलेचा विनयभंग, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 70 CCTV तपासले...

नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक

मिळालेल्या माहितीनुसार, जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अद्याप कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही. 

पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरु 

सोमवारी पहाटे काही अज्ञांत व्यक्तींकडून सुरेश शिंदे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. काही लोंकांनी शिंदेंच्या दगडफेक करत शिंदेंच्या कारच्या काचाही फोडल्या. सुरेश शिंदेंकडून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करण्यात येत आहे. माजी आमदार विलासराव जगतापांनी या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप केला. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे.

हे ही वाचा : मिरजेत मित्रांनीच तरुणाला ट्रॅकवर झोपवलं, रेल्वे अंगावरून गेल्याने हाता-पायांचे झाले तुकडे, तरीही जीव वाचला

दरम्यान, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतच मोठ्या प्रमाणात वाद होऊ लागले आहेत. अनगर नगरपंचायतीत काही दिवसांपूर्वी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिलं. त्यानंतर आता जतमध्ये ही परिस्थिती दिसून येत आहे. परिस्थिती पाहून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एका वेगळ्या वळणावर असल्याचं बघायला मिळेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp