मुंबईत भररस्त्यात परप्रांतियाकडून महिलेचा विनयभंग, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 70 CCTV तपासले...
mumbai crime : मुंबईतील गोरेगावात परप्रांतियाकडून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गोरेगावातील भररस्त्यात महिलेवर विनयभंग
आरोपीला पकडण्यासाठी 70 सीसीटीव्हींचा तपास
Mumbai Crime : मुंबई शहराची सुरक्षित शहर अशी एक ओळख आहे, पण याच सुरक्षित शहरात आता महिलांवर विनयभंगासारख्या घटना घड़ू लागलेल्या आहेत. मुंबईच्या गोरेगावात रस्त्याच्या मोधोमध एका महिलेचा विनयभंग केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा परप्रांतिय असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : “मुलगा बीडचा आहे, लग्न करू नको..” तरुणाने तिला संपवलं, घराला लॉक लावून त्यानं ट्रेनखाली जीव दिला, घटनेनं पुणे हादरलं
आरोपीला पकडण्यासाठी 70 सीसीटीव्हींचा तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नाव कुलदीप कनोजिया (वय 27) असे आहे. पोलिसांनी या घटनेनंतर त्याला तिसऱ्याच दिवशी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल 70 सीसीटीव्हींचा तपास केला आणि नंतर शोध घेत त्याला एका कारखान्यात अटक केली.
नुकताच एका डिलिव्हरी बॉयने एका महिलेच्या छातीला हात लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही घटना देखील मुंबईमधीलच होती. या प्रसंगाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता गोरेगावमध्ये एका महिलेचा भररस्त्यात विनयभंग केला. तेव्हा तिने मदतीचा हात मागितला पण प्रत्यक्षदर्शी पीडितेला मदत करण्यास असमर्थ ठरले.
हेल्पलाइनवर वारंवार कॉल पण उत्तर नाही...
तसेच तिनं सांगितलं की, तिला सामान्य हेल्पलाइन नंबर असो किंवा महिलांसाठी विशेष हेल्पलाइनवर वारंवार कॉल करूनही तिला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. तेव्हा महिलेनं शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.










