Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकूण हवामानाच्या अंदाजाबाबतची महत्त्वाची अपडेट पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'कसली चाटूगिरी... सत्ता असो नसो 'नमो' सेंटर फोडून टाकणार', राज ठाकरेंचा शिंदेंना थेट इशारा
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या विभागातील पालघर आणि रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत हवामान विभागाने हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच या भागात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. अहिल्यानगर, पुणे या भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे.
हे ही वाचा : सरकारी शिक्षकाकडून गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह दुचाकीवरून चार जिल्ह्यांत फिरवला, 'त्या' एका फोटोवरून...
विदर्भ विभाग :
राज्यातील विदर्भ विभागात हवामान विभागाने बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ, या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा कसलाही अंदाज जारी केला नाही. तसेच अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









