'कसली चाटूगिरी... सत्ता असो नसो 'नमो' सेंटर फोडून टाकणार', राज ठाकरेंचं शिंदेंना थेट आव्हान

मुंबई तक

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण, मतांमध्ये ते दिसून येत नाही असं लोक बोलायचे त्याचं कारण हे आहे. निवडणुकीला आणखी एक वर्षे लागुदे, मतदार याद्या स्वच्छ करा, असं राज ठाकरेंनी सभेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही धारेवर धरलं आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

point

मतांच्या चोरीवर राज ठकरेंचं भाषण

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण, मतांमध्ये तेी दिसून येत नाही असं लोक बोलायचे त्याचं कारण हे आहे. निवडणुकीला आणखी एक वर्षे लागुदे, मतदार याद्या स्वच्छ करा. जेव्हा मतदार याद्या स्वच्छ होईल, ज्याचा विजय होईल आणि ज्याचा पराभव होईल ते आम्हाला मान्य आहे. आज जे सत्तेत आहेत, त्यांच्या मतदार याद्या पारदर्शक केल्या आणि त्यांचाच विजय झाल्यास आम्हाला ते मान्य असेल. या सर्व गोष्टी लपवून निवडणुका घ्यायच्या यात मॅच तर फिक्स आहे, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. ते 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उपस्थितांना संबोधित करत होते. 

हे ही वाचा : सरकारी शिक्षकाकडून गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह दुचाकीवरून चार जिल्ह्यांत फिरवला, 'त्या' एका फोटोवरून...

गडांवर नमो टुरिझम सेंटर उभं केलं की...

या सभेत बोलताना राज ठाकरेंनी काही वृत्तपत्रांचा दाखला दिला आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता रायगड, राजगड, शिवनेरीवर नमो टुरिझम सेंटर नावाने स्पॉट उभारत आहेत. मी आता सांगतो सत्ता असो नसो, उभं केलं की फोडून टाकणार, असे म्हणत थेट सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. 

नेमकी कसली चाटूगिरी चालुये...' 

त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंनाही चांगलंच धारेवर धरलं. मला पुन्हा मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करावी, वरती पंतप्रधानांना देखील माहिती नाही की, खाली नेमकी कसली चाटूगिरी चालु आहे. हे सर्व कधी होतं जेव्हा डोक्यात सत्ता येते तेव्हा आम्ही वाटेल ते करू. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो मग काहीही असो. मुंबईतील जागा अडानीला जिथे बोट ठेवलं जाईल, तिथे जागा दिल्या जातील, असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले आहेत. 

त्यानंतर, त्यांनी मोर्चाबाबत सांगितलं की, या मत चोरीच्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा काढत आहोत, हा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे. दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. या माध्यमातून मी सर्वांना मोर्चास येण्याचे आवाहन करतो, असे राज ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp