Maharashtra Weather : हवामान विभाग (IMD) नुसार, 20 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाची शक्यता कायम राहणार आहे. 18 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे. राज्यात शक्यतो सध्या कोकण भागात माणसांची तीव्रता जाणवत आहे. तर नुकतंच मराठवाड्यातही पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात राज्यातील 20 सप्टेंबर रोजीचा हवामानाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सातारा हादरलं! पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, नंतर लोखंडी रॉडनेच केला हल्ला, महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या विभागाचा समावेश होती. याच विभागात हवामान विभागाने हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात हवन विभागाने पावसाचा अंदाज जारी केला आहे. या एकूण विभागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तेच 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांचा समावेश होतो. यापैकी पुणे, पुणे घाटमाथा आणि साताऱ्यात पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा :
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला या जिल्ह्याचा समावेश होतो. यापैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा : 'जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलाद, काही तरी गडबड... ' गोपीचंद पडळकरांच्या 'त्या' वक्तव्याने शरद पवार गट आक्रमक
विदर्भ :
विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी पावसाचा इशारा आहे.
ADVERTISEMENT
