Ahilyanagar Crime : अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका नराधमाने एकाच वेळी कुटुंबातील एकूण चार बहिणींवर लैंगिक अत्याचार केलेत. या घटनेनं अहिल्यानगर हादरून गेले आहे. अनेक दिवसांपासून आरोपी हा चार लहान बहिणींचं शोषण करत होता. नराधम आरोपी हा चारही बहिणींचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीसह त्याच्या बायकोलाही बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकरणातील तीन बहिणी या अल्पवयीन आहेत. तर एक विवाहित तरुणी असल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलाद, काही तरी गडबड... ' गोपीचंद पडळकरांच्या 'त्या' वक्तव्याने शरद पवार गट आक्रमक
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलींचे आई-वडील हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. यामुळे या चारंही मुली निराधार झाल्या होत्या. यामुळे या मुलींचा सांभाळ हा त्यांचे दूरचे नातेवाईक करत होते अशी माहिती समोर आली. सांभाळ करणाऱ्यानेच त्या चारही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी आता राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. याच प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
असा झाला घटनेचा खुलासा
हे प्रकरण एका 'उडान' प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले होते. संबंधित प्रकरणात या कार्यकर्त्यांनी लक्ष घातले आणि आरोपींची राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचमुळे या प्रकरणाचा मोठा खुलासा झाला होता. त्यानंतर राहुरी पोलिसांनी हालचाल करण्यास सुरुवात केली आणि दोघांना अटक करण्यात आली आहे. यानंतर पीडित मुलींची पोलिसांनी मुक्तता केली आहे.
राहुरी तालुक्यातील खळबळजनक घटनेतील पीडित असलेल्या चारही बहिणी एकाच कुटुंबातील आहेत. त्या सर्वचजणी या नाशिक जिल्ह्यातील असल्याचं तपासातून समोर आलं. नराधमाने विवाहित बहिणीचंही लैंगिक शोषण केलं. यानंतर पीडितेवर झालेल्या अत्याचाराची माहिती पतीला दिली होती.
हे ही वाचा : तरुणीचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला अन् ब्लॅकमेल... नंतर, मुलीच्या वडिलांनी घेतला 'असा' बदला!
या घटनेची माहिती उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतरच हे प्रकरण समोर आलं. आरोपींनं केवळ अल्पवयीनच नाही,तर एका विवाहित बहिणीचंही लैंगिक शोषण केले.
ADVERTISEMENT
