तरुणीचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला अन् ब्लॅकमेल... नंतर, मुलीच्या वडिलांनी घेतला 'असा' बदला!
एका वडिलांनी आपल्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी तरुणाची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने वेगळाच कट रचला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तरुणीचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला अन् ब्लॅकमेल...

मुलीच्या वडिलांनी घेतला 'असा' बदला!
Crime News: एका वडिलांनी आपल्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी तरुणाची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने वेगळाच कट रचला. या प्रकरणाचा खुलासा नेमका कसा झाला? सविस्तर जाणून घ्या.
अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल...
आग्रा येथील मलपुरा परिसरात राहणारा एक 17 वर्षीय मुलगा लग्न समारंभामध्ये व्हिडीओ बनवण्याचं म्हणजेच व्हिडीओग्राफर म्हणून काम करत होता. यादरम्यान, एका 16 वर्षीय मुलीकडे त्या मुलाचं लक्ष गेलं. संधी साधून त्या मुलाने पीडित मुलीचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला आणि त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तो अश्लील व्हिडीओ दाखवून आरोपीने मुलीकडे 50 हजार रुपयांची मागणी केली.
पीडितेने सगळं वडिलांना सांगितलं
या घटनेमुळे पीडिता अतिशय घाबरली आणि तिने ही सर्व बाब आपल्या वडिलांना सांगितली. पण, आरोपी तरुण काहीही केल्यास ऐकायला तयार नव्हता. तो सतत पीडितेला तिचा अश्लील व्हिडीओ दाखवून त्रास देत होता.
हे ही वाचा: पतीच्या मोबाईलमध्ये पाहिले 'ते' चॅट्स, पत्नी प्रचंड संतापली अन् जाब विचारताच घडली भयानक घटना...
18 फेब्रुवारी 2024 रोजी आरोपी तरुण त्याच्या कामासाठी एका लग्नात गेला आणि तिथून तो अचानक बेपत्ता झाला. त्यावेळी, सैंया पोलीस स्टेशन हद्दीत त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. परंतु, त्याची ओळख पटत नसल्यामुळे प्रकरणाच्या तपासात अडथळा येत होता.