पतीच्या मोबाईलमध्ये पाहिले 'ते' चॅट्स, पत्नी प्रचंड संतापली अन् जाब विचारताच घडली भयानक घटना...
एका विवाहित महिलेने विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. खरंतर, मृत महिलेच्या पतीचे बऱ्याच महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीच्य मोबाईलमध्ये पत्नीने पाहिले 'ते' चॅट्स

पत्नीने जाब विचारताच घडली भयानक घटना...
Crime News: सध्या, विवाहबाह्य संबंधातून एक विचित्र घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका विवाहित महिलेने विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. खरंतर, मृत महिलेच्या पतीचे बऱ्याच महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नीने एके दिवशी आपल्या पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच महिलेसोबतचे चॅट्स बघितले. या चॅट्समध्ये पतीने त्या महिलेला रोमॅन्टिक मॅसेजेस पाठवल्याचं पत्नीने पाहिलं. ते चॅट्स वाचून पत्नी अतिशय संतापली. याबद्दल पीडितेने आपल्या पतीला जाब विचारला असता उलट तिलाच मारहाण करण्यात आली. याच गोष्टीला वैतागून पत्नीने विष प्राशन करत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
आता पीडितेच्या कुटुंबियांनी तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली असून ही घटना नौबस्ता पोलीस स्टेशन परिसरातील राजीव नगर येथे घडल्याची माहिती आहे. येथे राहणारे मुकेश दुबे एका कंपनीमध्ये मॅनेजर असून त्यांचं जवळपास 14 वर्षांपूर्वी 38 वर्षीय राधा देवीसोबत लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. राधा देवीच्या भावाने पोलिसांना सांगितलं की सोमवारी (15 सप्टेंबर) रात्री आपल्या भाचीने फोन करून आईने विषारी पदार्थ खाल्याची माहिती दिली. त्यानंतर, कुटुंबीय पीडित महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा: क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली, नंतर अपहरण करून सामूहिक बलात्कार... पीडितेला 'त्या' ठिकाणी फेकलं अन्...
दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह चॅटिंग
मुकेशची दुसऱ्याच महिलेसोबत आक्षेपार्ह चॅटिंग वाचल्यानंतर दोन्ही पती-पत्नीमध्ये वाद वाढत गेल्याचा पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. यासंबंधी पीडितेचा भाऊ योगेशने सुद्धा राधाने तिच्या पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेसोबतची चॅटिंग वाचली. त्या चॅटिंगमध्ये 'बग्गू लव्ह यू', 'माझी बग्गू जेवली का?' असे रोमॅन्टिक मॅसेज आढळले. यामुळे संतापलेल्या राधाने आपल्या पतीला याचा जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला.
हे ही वाचा: 71 वर्षांच्या महिलेवर जडलं प्रेम! लग्नासाठी बोलवलं अन् नको तेच घडून बसलं...
पतीचे बऱ्याच महिलेसोबत अनैतिक संबंध...
मुकेशचे बऱ्याच महिलांसोबत अनैतिक संबंध असून मृत महिला पतीच्या या कृत्याला विरोध करत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. याच गोष्टीवरून त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. खूप वेळी समजावून सुद्धा मुकेश त्याचं हे कृत्य थांबवत नव्हता. यावेळी तर पत्नीने पतीचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅट्स पाहिले आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी प्रकरणातील तपासाला सुरूवात केली आहे. मोबाईल चॅट्सचं तथ्य उघडकीस आणण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. याव्यतिरिक्त, मृताच्या कुटुंबियांचे तपशीलवार जबाब घेतले जात आहेत. तक्रारीच्या आधारे, आरोपी मुकेश दुबे याच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.