71 वर्षांच्या महिलेवर जडलं प्रेम! लग्नासाठी बोलवलं अन् नको तेच घडून बसलं...
71 वर्षीय अमेरिकन नागरिक तसेच एका भारतीय वंशाच्या महिलेची हत्या झाल्याचं आढळून आलं आहे. संबंधित महिलेची हत्या जुलै महिन्याच्या शेवटी झाली असून नुकताच या प्रकरणाचा खुलासा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

71 वर्षांच्या महिलेवर जडलं प्रेम!

लग्नासाठी अमेरिकेहून बोलवलं अन्... मोठं हत्याकांड
Murder case: पंजाबमधील लुधियाना येथून एका धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. किला रायपूर नावाच्या गावात 71 वर्षीय अमेरिकन नागरिक तसेच एका भारतीय वंशाच्या महिलेची हत्या झाल्याचं आढळून आलं आहे. मृत महिलेचे नाव रुपिंदर कौर पंधेर असल्याची माहिती समोर आली. संबंधित महिलेची हत्या जुलै महिन्याच्या शेवटी झाली असून नुकताच या प्रकरणाचा खुलासा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या हत्येमागच्या आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.
प्रकरणातील आरोपीचं नाव सुखजीत सिंह सोनू आहे. तसेच, पीडिता रुपिंदर कौर घटस्फोटित असून ती बऱ्याच वर्षांपासून अमेरिकेत होती. मृत महिला लग्न करण्यासाठी भारतात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चरणजीत सिंह ग्रेवाल नावाच्या व्यक्तीने तिच्या हत्येची योजना आखली होती. पीडितेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर, आरोपीने पीडितेला जाळलं. ही महिला आरोपी पुरूषाशी लग्न करण्यासाठी भारतात आली होती. चरणजीत सिंग ग्रेवाल सध्या इंग्लंडमध्ये असून तो बऱ्याच काळापासून त्या महिलेच्या संपर्कात होता.
हे ही वाचा: प्रेयसीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं, नंतर हायवेवर विवस्त्र अवस्थेत... डॉक्टरने तरुणीसोबत नेमकं काय केलं?
'असा' झाला घटनेचा खुलासा
या प्रकरणाची अधिक माहिती लवकरच उघडीस आणण्यासाठी पोलीस काम करत आहेत. तसेच, लुधियाना पोलिसांनी महिलेच्या बेपत्ता होण्याबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये संशयितांची नावे दिल्यानंतरच संपूर्ण घटना उघडकीस आली. एका रिपोर्टनुसार, रूपिंदर कौर पंढेर इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एनआरआय चरणजीत सिंह ग्रेवाल याच्या सांगण्यावरून भारतात आली होती. चरणजीतसोबत लग्न करणं, हेच तिच्या भारतात येण्यामागचं कारण होतं.
हे ही वाचा: 'दिघे शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते आणि त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या बाजूला..', राऊत प्रचंड चिडले अन्...
आरोपीने पोलिसांकडे केलं कबूल...
ग्रेवालनेच पीडित महिलेच्या हत्येचा कट रचल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी सुखजीत सिंग सोनूने महिलेच्या हत्येची कबुली दिली असून त्याने लग्नाच्या नावाखाली महिलेला फसवण्यासाठी हा संपूर्ण कट रचण्यात आला असल्याचं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. आरोपीला महिलेकडून लाखो रुपये लुबाडायचे होते. रुपिंदर कौरने आरोपी सोनू आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केली. आता पोलीस रुपिंदर कौर पंढेरच्या सांगाड्याचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.