प्रेयसीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं, नंतर हायवेवर विवस्त्र अवस्थेत... डॉक्टरने तरुणीसोबत नेमकं काय केलं?
पेशाने डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला आधी तीन इंजेक्शन दिले आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेयसीसोबत डॉक्टर प्रियकराने केलं घृणास्पद कृत्य...

हायवेवर विवस्त्र अवस्थेत... डॉक्टरने तरुणीसोबत नेमकं काय केलं?
Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली येथून तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे. येथे पेशाने डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीने तरुणीला आधी तीन इंजेक्शन दिले आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. इतकेच नव्हे तर, पीडित तरुणीला विवस्त्र करून दिल्लीच्या लखनऊ हायवेवर फेकून देण्यात आलं. प्रकरणातील पीडिता ही आरोपी डॉक्टरची प्रेयसी असल्याची माहिती आहे.
आरोपीने पोलिसांकडे केलं कबूल...
त्यावेळी हायवेवर एका वाहनाने पीडितेला चिरडल्यानंतर तिचा मृत्यू हा रस्ता अपघात मानला जाईल, असं आरोपीला वाटलं. परंतु तिथल्या गावकऱ्यांचं तरुणीकडे लक्ष गेलं. पीडिता रक्तबंबाळ अवस्थेत होती. त्यानंतर, गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिथून पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी डॉक्टरची चौकशी केली. सुरुवातीला, आरोपीने पीडितेला ओळखत नसल्याचं सांगितलं. पण, पोलिसांनी डॉक्टरचे कॉल डिटेल्स दाखवल्यानंतर, सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला. त्यावेळी आरोपीने संबंधित तरुणी आपली प्रेयसी असल्याचं कबूल केलं.
दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले
डॉक्टरने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की त्याला त्याच्या प्रेयसीपासून सुटका हवी होती आणि म्हणूनच त्याने तिच्यावर अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता बंदायुची रहिवासी असून पाच वर्षांपूर्वी तिने बरेली मेडिकल कॉलेजमधून नर्सिंगचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तिला बीसलपूर रोडवरील एका खाजगी रुग्णालयात नोकरी मिळाली. तिथेच तिची भेट एका बीएएमएस डॉक्टरशी झाली. कालांतराने, त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! लवकरच 'या' ठिकाणाहून रो-रो सेवा... काय होणार फायदा?
प्रियकर आधीच विवाहित असल्याचं कळालं
पण, डॉक्टरने पीडितेला आश्वासन देऊन महिलेला फसवलं आणि नंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचं पीडितेला कळालं. यामुळे आरोपी डॉक्टर आणि तरुणीमध्ये भांडण झालं. मंगळवारी (16 सप्टेंबर) महिलेनं डॉक्टरला तिच्या पोटात दुखत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोपी तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला आणि तिला तीन इंजेक्शन दिली. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केले.