'दिघे शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते आणि त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या बाजूला..', राऊत प्रचंड चिडले अन्...
Shiv Sena vs Shiv Sena UBT: पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा बाजूबाजूला फोटो छापण्यात आल्याने संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना फ्रंट पेज जाहिरात दिली होती. पण याच जाहिरातीवरून आता शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंकडून जी जाहिरात देण्यात आली होती त्या जाहिरातीत सगळ्यात वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले होते. पण यावरूनच संजय राऊत हे मात्र, प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले...
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'तुम्ही ज्या मिंध्यांच्या जाहिरातीचं जे कॅम्पेन करताय.. म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत. बाळासाहेब नाही ना.. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखाएवढा पण नाहीए. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा (आनंद दिघे) फोटो लावता?'
'ही कोणती नवी पद्धत आणली तुम्ही? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते. ते शिवसेनेचे नेतेही नव्हते. ते उपनेते नव्हते.. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते.'
हे ही वाचा>> मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक, नेमकं काय घडलं?
'तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं.. का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड या लोकांना खतम करायचा का अशा पद्धतीने?'