Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोसावी वस्तीवर पतीने आपल्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत लोखंडी गजाने हल्ला करत खून केला. त्यानंतर पती स्वत: पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर राहिला होता. ही धक्कादायक घटना बुधवारी घडल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या महिलेला संपवण्यात आले त्या महिलेचं नाव पिंकी विनोद जाधव (वय 21) असे आहे. तर आरोपी पतीचं नाव विनोद विजय जाधव (वय 26) असं आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलाद, काही तरी गडबड... ' गोपीचंद पडळकरांच्या 'त्या' वक्तव्याने शरद पवार गट आक्रमक
पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला
घडलेल्या घटनेनुसार, बुधवारी दुपारी एक वाजता संशयित आरोपी विनोद जाधव स्वत:हून पुसेगाव पोलीस ठाण्यात गेला. तेव्हा त्याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरूनच तिच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला केला. तसेच या झालेल्या हल्ल्यात ती राहत्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे.
मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तेव्हा पत्नी पिंकीचा मृतदेह हा घरात रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडला होता. तेव्हा त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीनेच पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर उपचाराआधीच ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
हे ही वाचा : ट्यूशनसाठी घराबाहेर पडली मुलगी, नंतर दोघांनी अपहरण करत केलं लैंगिक शोषण अन् 'त्या' ठिकाणी दिलं फेकून...
मृत झालेल्या महिलेला तीन लहान मुलं आहेत. या घटनेनं खटाव तालुक्यातील कटगुण आणि पुसेगावात हादरून गेलं आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी विनोज जाधव यांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
