Govt Job: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून DEPR (आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग) आणि DSIM (सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग) च्या ग्रेड B पदाच्या 120 रिक्त जागांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना केवळ rbi.org.in या RBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
ADVERTISEMENT
या भरतीमधील एकूण पदांपैकी, जनरल कॅडरमध्ये 83, DEPR मध्ये 17 आणि DSIM मध्ये 20 रिक्त पदे असून यामध्ये बॅकलॉग रिक्त पदांचा समावेश आहे. जनरल कॅडरसाठी फेज-1 परीक्षा 18 ऑक्टोबर 2025 रोजी आणि फेज-2 परीक्षा 6 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केली गेली आहे. तसेच, DEPR आणि DSIM पदांसाठी फेज-1 परीक्षा 19 ऑक्टोबर 2025 आणि फेज-2 परीक्षा 7 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं वय 1 सप्टेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षांदरम्यान असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, आरक्षित प्रवर्ग, अपंग उमेदवार, माजी सैनिक आणि उच्च पात्रता असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: तरुणीचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला अन् ब्लॅकमेल... नंतर, मुलीच्या वडिलांनी घेतला 'असा' बदला!
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
जनरल कॅडर: कोणत्याही विषयात किमात 60 टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांकडे किमान 50 टक्के गुणांसह ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
DEPR: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अर्थशास्त्र विषयात किमान 55 टक्के गुणांसह मास्टर्स डिग्री असणं गरजेचं आहे. तसेच, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांकडे 50 टक्के गुणांसह संबंधित डिग्री असणं आवश्यक आहे. या क्षेत्रात डॉक्टरेट किंवा संशोधन/शिक्षण या क्षेत्रातील अनुभवाचा विचार केला जाणार नाही.
DSIM: या पदांवर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांकडे सांख्यिकी, गणित, अर्थमिती, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा अॅनालिटिक्स किंवा संबंधित क्षेत्रात किमान 55 टक्के गुणांसह मास्टर्स डिग्री असणं अनिवार्य आहे. तसेच, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी, किमान 50 टक्के गुणांसह संबंधित विषयात मास्टर्स डिग्री किंवा किमान 60 टक्के गुणांसह समान विषयात चार वर्षांची बॅचलर पदवी असणं गरजेचं आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! लवकरच 'या' ठिकाणाहून रो-रो सेवा... काय होणार फायदा?
पगार
या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा 78,450 रुपये मूळ वेतन आणि अंदाजे 1.5 लाख रुपये एकूण वेतन (HRA वगळून) भत्ते मिळतील.
तसेच, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 850+जीएसटी शुल्क भरावं लागेल. याशिवाय, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये+ जीएसटी शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, आरबीआय स्टाफ उमेदवारांना यामध्ये सूट दिली जाईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता, अटी जाणून घेण्यासाठी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
ADVERTISEMENT
