Govt Job: इंजिनीअर असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी निघाली मोठी भरती...

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून जुनिअर इंजिनीअर (JE) च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इंजिनीअर असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

इंजिनीअर असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मुंबई तक

• 01:17 PM • 17 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंजिनीअरचं शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी!

point

'या' पदांसाठी निघाली मोठी भरती...

Govt Job: इंजिनीअरीचं शिक्षण घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून जुनिअर इंजिनीअर (JE) च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना iocl.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करणं आवश्यक आहे. भरतीसाठी फॉर्म केवळ ऑनलाइन माध्यमातूनच भरता येऊ शकतो. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

जुनिअर इंजीनिअर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रात किमान 65 टक्के गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण गुणांमध्ये 10 टक्के सूट देण्यात आलेली आहे. याशिवाय, भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं कमाल वय 26 वर्षे निश्चित करण्यात आलेलं आहे आणि 1 जुलै 2025 तारीख लक्षात घेऊनच वयाची गणना केली जाईल. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी... किती असेल भाडं?

किती मिळेल वेतन? 

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कंप्यूटर बेस्ट टेस्ट (CBT), ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुप टॉक आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाईल. तसेच, नियुक्त झालेल्या उमेदवारांना पे स्केल 30,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल. 

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ibpsonline.ibps.in/ioclsep25/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या. 
2. वेबसाइटच्या होमपेजवरील Click here for New Registration यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 
3. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांनी इतर माहिती भरून अर्ज भरून घ्या. 
4. शेवटी, अर्जाचं निर्धारित शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा. 
5. त्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 13 ऑक्टोबर 2025 ही प्रिंट काढण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

हे ही वाचा: Govt Job: आता कोणत्याही परीक्षेशिवाय बँक ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी... लाखाच्या घरात मिळेल पगार अन्...

अर्जाचं शुल्क

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 400 रुपये भरावे लागतील. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात सूट दिली असून एसटी/एससी/ पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही. 

    follow whatsapp