Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची चांगली स्थिती पाहायला मिळतेय. तर मुंबईमध्ये एका आठवड्यापूर्वी पावसाने रेड अलर्ट जारी केला होता. अशातच आता 28 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने पालघर आणि कोकण पट्ट्यातील काही भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या सरींसह वातावरण ढगाळ राहील असा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मनोज जरांगेंना बाप्पा पावले, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आझाद मैदानावर जरांगे तळ ठोकणार
कोकण विभाग :
कोकण भागातील विशेषतः ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार 40-50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्य पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी हवामा विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 3-4 तासांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि अहमदनगर येथे हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील. घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा शक्यता आहे. तर काही ठिकाणी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तापमानाचा विचार केल्यास 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमानाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
विदर्भ विभाग:
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे मध्यम ते जोरदार हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच यवतमाळ आणि वर्धा येथे ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, उद्धव ठाकरेंसह कुटुंबही दर्शनाला, नेमकं काय साकडं घातलं?
उत्तर महाराष्ट्र:
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे येथे हलक्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी उघडीप राहण्याची शक्यता आहे. तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
ADVERTISEMENT
