Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातच का साजरी करतात? जाणून घ्या यामागची अध्यात्मिक कारणे

Ganpati Utsav 2025 :  गणेशोत्सवाची सुरुवात मोठ्या धुमधडाक्यात सुरु झाली असून आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. जेव्हा भाद्रपद महिना येतो, गणेशोत्सवाची चाहूल सर्वच गणेशभक्तांना लागते.

गणेश चतुर्थी २०२५ (छायाचित्र: एआय जनरेटेड)

गणेशोत्सवादरम्यान कांदा, लसूण आणि अल्कोहोल टाळा (छायाचित्र: एआय जनरेटेड)

मुंबई तक

• 03:07 PM • 27 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भगवान श्री गणेशाचा जन्म कसा झाला?

point

हत्तीचं शीर देऊन जीवनदान

point

श्री गणेश चतुर्थीचं महत्त्व

Ganpati Utsav 2025 :  गणेशोत्सवाची सुरुवात मोठ्या धुमधडाक्यात सुरु झाली असून आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. जेव्हा भाद्रपद महिना येतो, गणेशोत्सवाची चाहूल सर्वच गणेशभक्तांना लागते. गणेशाच्या आगमनासाठी प्रत्येक घरात रंगरंगोटी, आकर्षक मखर करून सजावट केली जाते. गणपती बाप्पा मोरया अशा घोषणेनं संपूर्ण परिसर दुमदुमतो. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेश देवाची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केली जाते. पण भाद्रपद महिन्यातच गणेशोत्सवाचा शुभारंभ का होतो? काय आहे या तिथीचं अध्यात्मिक महत्त्व? याबाबतच्या सर्व परंपरा आणि धार्मिक गोष्टींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

भगवान श्री गणेशाचा जन्म

पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने पवित्र शरीरावर हळदी आणि उटणे लावलं होते. त्यानंतर माता पार्वतीने अंगावरील हळद आणि उटणं काढून एक पुतळा तयार केला. त्यानंतर पार्वती मातेनं अध्यात्मिक शक्तीने त्या पुतळ्याला जीवंत केलं. अशाप्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला. त्यानंतर श्री गणेशाला पार्वती मातेनं द्वारपाल म्हणून उभं केलं आणि त्या स्नान करण्यासाठी गेल्या. त्याचदरम्यान भगवान शंकर तिथे आले. त्यानंतर श्री गणेशानं त्यांना रोखलं. त्यानंतर क्रोधित झालेल्या महादेवानं गणेशाचं शीर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वतीने हे पाहिलं, तेव्हा त्या व्याकूळ झाल्या. 

हत्तीचं शीर देऊन जीवनदान

नाराज झालेल्या माता पार्वतीला शांत करण्यासाठी महादेवानं श्री गणेशाला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या देवतांना आदेश दिला आणि ते उत्तर दिशेला आलेल्या पहिल्या प्राण्याचं शीर घेऊन आले. म्हणजे समोरून आलेल्या हत्तीचं शीर श्री गणेशाला लावलं. त्यानंतर श्री गणेश पुनर्जीवित झाले आणि त्यांना गजमुख आणि गजानन असं संबोधलं गेलं. तेव्हापासून पहिल्या पूजेचा मान श्री गणेशाला मिळाला. 

हे ही वाचा >> मनोज जरांगेंनी केली गणपती बप्पांची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी फडणवीसांनी खेळली खेळी?

अन्य धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथिलाच श्री गणेशाने महर्षी वेदव्यास यांच्या सांगण्यावरून महाभारत ग्रंथलेखनाला सुरुवात केली. या पवित्र ग्रंथाला लिहिण्याआधी श्री गणेशाने अट ठेवली होती की, लेखन मध्येच थांबवता येणार नाही आणि वेदव्यास यांना न थांबता वाचन करावं लागेल. या व्रतानुसार, या महान कार्याची सुरुवात करण्यात आली. 

श्री गणेश चतुर्थीचं महत्त्व

भादप्रद शुक्ल चतुर्थीलाच गणेश उत्सवाची सुरुवात झाली. यामागे धार्मिक घटनांचं कारण आहे. या दिवसापासून प्रारंभ होऊन दहा दिवसांपर्यंत सुरु राहणारा गणेशोत्सव एक धार्मिक पर्वच नाही, तर अध्यात्मिक यात्रा आहे. या दिवशी गणेशभक्त मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतात आणि या कष्टी बनलेल्या आयुष्यातून सायोज्यमुक्ती आणि मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी श्री गणेशाची प्रार्थना करतात.

हे ही वाचा >> गणपती बप्पाचं आगमन आणि विसर्जन करताना सावधान, मुंबईतील हे पूल धोकादायक,उत्सवाला लागेल गालबोट

    follow whatsapp