गणेश चतुर्थी 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहणं अशुभ का मानलं जातं? चुकून पाहिलं तर काय होतं?

गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये? असा अनेकांना प्रश्न पडत असेल. खरंतर, धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्र पाहिला तर त्या व्यक्तीवर खोटा आळ येतो. पण, असं का ते जाणून घ्या.

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहणं अशुभ का मानलं जातं?

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहणं अशुभ का मानलं जातं?

मुंबई तक

• 11:38 AM • 27 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहणं अशुभ का मानलं जातं?

point

यामागची रंजक कहाणी जाणून घ्या,

Ganesh Chaturthi 2025: संपूर्ण भारतभर गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी गणेश भक्त अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करतात आणि प्राणप्रतिष्ठापणा करून मनोभावे पूजा करतात. गणरायाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं विशेष महात्म्य आहे. पण याच काळात एका गोष्टीची बरीच चर्चा होते ती म्हणजे, गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये? खरंतर, धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्र पाहिला तर त्या व्यक्तीवर खोटा आळ येतो. पण, असं का ते जाणून घ्या. गणेश चतुर्थीला चंद्राकडे का पाहू नये, यामागची सविस्तर कथा पाहूयात...

हे वाचलं का?

धार्मिक मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणं अशुभ मानलं जातं. एका पौराणिक कथेनुसार, एके दिवशी गणपती बाप्पा त्यांचं वाहन उंदरावर बसून जात असताना वाटेत त्यांचा तोल गेला आणि बाप्पा खाली पडले. त्यावेळी चंद्राने हे सगळं पाहिलं आणि तो बाप्पांवर हसू लागला. त्यावेळी गणपती बाप्पांना ते अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी रागाच्या भरात चंद्राला शाप दिला की भाद्रपद चतुर्थीला जो कोणी तुला पाहील त्याच्यावर खोटे आरोप केले जातील आणि त्याला बदनामीचा सामना करावा लागेल.

हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष का केला जातो? ‘मोरया’ शब्दामागचा इतिहास माहितीये?

श्रीमद् भागवत कथेत उल्लेख  

एका पौराणिक कथेत म्हटलं आहे की, एकदा भगवान श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्राकडे पाहिल्याने त्यांच्यावर स्यामंतक मणी चोरल्याचा खोटा आळ लागला होता. भगवान श्रीकृष्णाला या आरोपातून मुक्त होण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले असल्याचा उल्लेख श्रीमद् भागवत कथेत करण्यात आला आहे.

हे ही वाचा: गणेशोत्सवाच्या काळात सायबर भामट्यांपासून सावध... बाप्पाचं ऑनलाइन दर्शन आणि प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

यादिवशी चुकून चंद्र पाहिला तर काय करावं

कधीतरी चुकून यादिवशी चंद्र दिसला तर नेमकं काय करावं? असा बऱ्याचजणांना प्रश्न पडतो. यासाठी शास्त्रांमध्ये उपाय देखील सांगितले आहेत. जर तुम्हाला भाद्रपद शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसला तर  गणपतीची आराधना आणि व्रत ठेवा. यामुळे चंद्रदोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच भगवान श्रीकृष्णाचा नामजप करा. विशेषतः स्यामंतक मणीची कथा ऐकल्याने चंद्रदोष दूर होतात. याशिवाय, भगवान गणेशाला मोदक अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.

    follow whatsapp