ADVERTISEMENT
Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) 26 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील हवामानाबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स जारी केले आहेत. राज्यात 26 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नाशिक आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी येलो अलर्ट राहील असा अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : 15 दिवस बॉयफ्रेंडकडं आणि 15 दिवस पतीकडे... विवाहित महिलेची अजबच मागणी, पतीनं जोडले हात अन्...
कोकण :
कोकण किनारपट्टीववरील भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाची आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. विशेष करून रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग हा 50 किमी असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होण्याची चिन्हे आहेत. तर काही ठिकाणी पुन्हा पावसाला सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा : हॉटेलमध्ये सुरू होता घाणेरडा खेळ, 1 हजार रुपयांपासून तरुणी मिळायच्या, पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पकडलं अन्...
मराठवाडा आणि विदर्भ :
छत्रपती संभाजीनगर , जालना, बीड आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतील विविध भागात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
