Maharshtra Weather: पुन्हा कोसळणार दमदार पाऊस, कोकणासह नाशिकलाही येलो अलर्ट!

maharashtra weather today: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार ताज्या अंदाजानुसार, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामानात बदल अपेक्षित आहेत.

maharashtra weather (Grok)

maharashtra weather

मुंबई तक

25 Aug 2025 (अपडेटेड: 25 Aug 2025, 09:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार

point

25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांतील हवामानात बदल

हे वाचलं का?

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामानात बदल अपेक्षित आहेत. मान्सूनचा जोर कायम असून, काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.

हे ही वाचा : मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड

कोकण : 

कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे. या विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पूरस्थितीचा धोका असल्याने स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

मराठवाडा :

त्याचप्रमाणे मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली येथे मध्यम स्वरुपाच्या पावसाची स्थिती आहे, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. यातील लातूर हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : आख्खा गाव हादरला! नराधम पतीने गर्भवती महिलेचे तुकडे तुकडे केले अन् नदीत फेकले..नेमकं घडलं तरी काय?

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र :

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव येथे हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

 

    follow whatsapp