Govt Job: सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी... 'या' पदांसाठी करा अप्लाय! आजपासून अर्ज करण्यासाठी सुरूवात..

सीमा सुरक्षा दल (BSF) कडून हेड कॉन्स्टेबल, रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी भरती जाहीर करण्यासाठी आली आहे.

सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी... 'या' पदांसाठी करा अप्लाय!

सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी... 'या' पदांसाठी करा अप्लाय!

मुंबई तक

• 01:42 PM • 24 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सीमा सुरक्षा दल (BSF) नवी कडून भरती जाहीर

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Govt Job: सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. BSF कडून हेड कॉन्स्टेबल, रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी भरती जाहीर करण्यासाठी आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 24 ऑगस्टपासून सुरू झाली असून 23 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून  भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र ( Chemistry) आणि गणित (मॅथेमेटिक्स) या विषयांसोबत किमान 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. यासोबतच, संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांच्या आयटीआय सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे. 

वयोमर्यादा

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. सरकारी नियमांनुसार, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी तसेच एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख घेऊन वयाची गणना केली जाईल.

हे ही वाचा:  मुलीने दिला लग्नाला नकार! वडिलांनी रागाच्या भरात उशीने तोंड दाबून केली हत्या; नंतर स्वत:सुद्धा... हिंगोलीतील धक्कादायक घटना

अर्ज करण्याची प्रक्रिया

1. बीएसएफ हेड कॉन्स्टेबल भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम  rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. वेबसाइटच्या होमपेजवरील Current Recruitment Openings मध्ये जाऊन भरतीच्या संबंधित लिंकवर क्लिक करा. 
3. त्यानंतर आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. 
4. रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांनी इतर आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण भरा. 
5. शेवटी अर्जाचं शुल्क (लागू असल्यास) भरा आणि भरलेला फॉर्म सबमिट करा.

हे ही वाचा: इंस्टाग्रामवर झाली मैत्री, नंतर बिझनेस वाढवण्याचं आमिष... ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार!

निवड प्रक्रिया

या भरतीच्या माध्यमातून तीन टप्प्यात उमेदवारांची रिक्त पदांसाठी निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात, उमेदवारांना PST आणि PET म्हणजेच शारीरिक क्षमता चाचणीमध्ये सहभागी व्हावं लागेल. या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांसाठी कंप्यूटर आधारित परीक्षा आयोजित केली जाईल. यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना अखेर  डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन, डिक्सन चाचणी आणि परिच्छेद वाचन फक्त HC(RO) साठी आणि वैद्यकीय तपासणी (DMR/RME) साठी उपस्थित राहावं लागेल. यानंतर, उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल. 

    follow whatsapp